Nicolas Maduro sakal
ग्लोबल

Nicolas Maduro : मादुरो तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी;निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा विरोधकांचा आरोप,निकालावर संशय

व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी निकोलस मादुरो हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. विरोधी पक्षाने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत निकालावर संशय व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

काराकस : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी निकोलस मादुरो हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. विरोधी पक्षाने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत निकालावर संशय व्यक्त केला आहे. अध्यक्षपदासाठी रविवारी (ता.२८) मतदान झाले होते. मतमोजणीनंतर काल रात्री उशीरा निकाल जाहीर करण्यात आला.

व्हेनेझुएलाच्या ‘नॅशनल इलेक्ट्रॉल कौन्सिल’ने मादुरो हे ५१ टक्के मत मिळवून विजयी झाल्याचे घोषित केले. प्रमुख विरोधक एडमुंडो गोंझालेझ यांना ४४ टक्के मते मिळाली. मादुरो निष्ठावंतांचे नियंत्रण असलेल्या येथील मुख्य निवडणूक यंत्रणेने देशभरातील प्रत्येकी ३० हजार मतदान केंद्रांवरील आकडेवारी लवकर जाहीर न केल्याने विरोधकांना निकालाला आव्हान देणे कठीण झाले. केवळ ३० टक्के मतदान पेट्यांची माहिती मिळाल्याचा दावा निवडणूक यंत्रणेने केला. मतदान केंद्रांवर काल मोठी गर्दी होती. नोंदणीकृत दोन कोटी लोकांनी मतदान केले होते.

निवडणुकीत विजय मिळणारच, असा ठाम विश्‍वास विरोधी पक्षाला होता. निकाल जाहीर होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून विजयाचे दावे करण्यास सुरुवात केली होती. मतदानोत्तर चाचण्यांमध्येही गोंझालेझ मोठ्या फरकाने जिंकणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे विरोधकांचा विश्‍वास दुणावला होता. पण निकाल पूर्णतः उलट लागल्याने विरोधकांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

परदेशी नेत्यांनी हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. निकालाची संपूर्ण आकडेवारी जाहीर करण्याचे आश्‍वासन निवडणूक यंत्रणेने दिल्याने विविध देशांच्या नेत्यांनी निकालाला मान्यता दिलेली नाही.

निकाल अधिकृत नसल्याने आम्ही त्याला मान्यता देणार नाही. जो निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यात व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या इच्छेचे किंवा मतांचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने अमेरिकेला गंभीर चिंता वाटत आहे.’’

अँटोनी ब्लिंकन, परराष्ट्र मंत्री, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT