Nigeria Church Attack 
ग्लोबल

चर्चमध्ये घुसले आणि थेट गोळीबार, ५० जणांचा जागेवर मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण-पश्चिम नायजेरियातील एका कॅथलिक चर्चमध्ये रविवारी बंदूकधाऱ्यांनी प्रर्थनेसाठी जमलेल्या व्यक्तींवर गोळीबार केला. काही ठिकाणी स्फोटकांचा बार देखील उडवण्यात आल्याची माहिती आहे.

पेन्टेकोस्ट या ठिकाणी रविवारी प्रार्थना करण्यासाठी लोक जमले होते. याच मास प्रार्थनेदरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानं नायजेरियात खळबळ माजली आहे. अनेकजण जखमी झालेत. आतापर्यंत ५० जणांचे मृतदेह सापडले असून चर्चच्या फादरचं अपहरण करण्यात आलं आहे.

शस्त्रास्त्र घेऊन आलेल्यांनी चर्चला टार्गेट केलं.

रविवारी सकाळी नायजेरियातील एका चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी काही कॅथलिक बांधव जमले होते. त्यावेळी शस्त्रास्त्र घेऊन आलेल्यांनी चर्चला टार्गेट केलं. यात प्रार्थनेसाठी आलेल्या महिला आणि मुलांवर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नायजेरियातील ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चला लक्ष्य केल्याचं स्थानिक नेते ओगुनमोलसुयी ओलुवोले यांनी सांगितलं. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश असून जवळपास 50 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय.

चौकशीसाठी पथकं स्थापन.. कडक कारवाईची मागणी

मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. उपस्थितांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्याचा स्थानिक सरकारने निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सरकारने विशेष पथकं स्थापन केली आहेत. हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याची कसून तपासणी होणार आहे. अद्याप कोणत्याही फुटीरतावादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

नायजेरियाच्या विधायी चेंबरमधील ओवो क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे अडेलेग्बे टिमिलीन यांनी संबंधित प्रकरणात सविस्तर माहिती दिली आहे. चर्चच्या फादरचेही अपहरण करण्यात आलं, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला नवा संघ मिळाला... मुळ किंमतीच्या पाचपट रक्कम; शिवम दुबेसह आता धुमाकूळ घालणार भाई...

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

SCROLL FOR NEXT