ग्लोबल

नायजेरियात २०० जणांकडून बाजारात गोळीबार; ४३ जण मृत्यूमुखी

सकाळ डिजिटल टीम

नायजेरियातील बाजारात तब्बल २०० जणांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. नायजेरियातील सोकोटो राज्याच्या गव्हर्नर कार्यालयाकडून सोमवारी याची माहिती देण्यात आली आहे .

सोकोतो राज्यातील एका गावातील बाजारात बंदुकधाऱ्यांना हल्ला केला. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. सोकोतो सरकारचे प्रवक्ते मुहम्मद बेल्लो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरोन्यो गावामध्ये हा हल्ला झाला आहे. यामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमावारी सांयकाळी ही घटना घडली. बाजाराच्या दिवशीच हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. याठिकाणी अनेक ग्राहक आणि व्यापारी आले होते.

सोकोतोचे गव्हर्नर अमीनू वजीरी तंबुवाल यांनी म्हटलं की, हल्लेखोरांनी रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत हल्ला केला. नायजेरियाच्या या भागात अनेक वर्षांपासून या डाकुंनी दहशथ निर्माण केली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर लूटमार केली आहे. मात्र अलिकडच्या काळात हिंसक घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Success Story: भाड्याचे घर अन् 10 हजारांच्या पगारातून सुरुवात! मात्र आज तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक

Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

Latest Marathi News Update : उरुळी कांचन येथे २३० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT