G20 Summit eSakal
ग्लोबल

G20 Summit : 'आता वाजले की बारा...'; मराठी गाण्याने नायजेरियाच्या अध्यक्षांचं स्वागत? व्हिडिओ होतोय व्हायरल

G20 परिषदेच्या बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे मंगळवारी सायंकाळी भारतात दाखल झाले.

Sudesh

G20 परिषदेच्या बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे भारतात दाखल झाले आहेत. याठिकाणी विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

याला कारण म्हणजे, नायजेरियाच्या अध्यक्षांच्या स्वागतावेळी मराठी गाणं लावण्यात आलं होतं. या प्रसंगाचा व्हिडिओ सिद्धांत सिबल या एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. अर्थात, या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी पालम येथील लष्करी हवाई अड्ड्यावर बोला यांचं स्वागत केलं. जी-20 शिखर परिषदेमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कित्येक देशांचे अध्यक्ष येणार आहेत. यांपैैकी सर्वात प्रथम बोला यांचं आगमन झालं आहे.

या वेळी नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री युसूफ तुग्गर आणि भारतातील नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले हेदेखील उपस्थित होते. नवी दिल्लीमध्ये नऊ आणि 10 सप्टेंबर रोजी G20 बैठक पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT