Puerto Rican twitter
ग्लोबल

Plane Crash : म्युझिक प्रोड्युसरसह ९ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

एका खासगी विमानाला झालेल्या अपघातात डोमिनिकन रिपब्लिकमध्ये ९ जणांनी प्राण गमावले आहेत.

डोमिनिकन रिपब्लिकमध्ये (Dominican Republic) भीषण विमान दुर्घटना (Plane Crash) घडली आहे. डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये एक खासगी विमान क्रॅश झालं. या दुर्घटनेत ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याबाबतचे वृत्त एअरलाइन्सच्या हवाल्यानं एफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विमानातून ७ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला अपङात झाला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करताना ही दुर्घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये म्युझिक प्रोड्युसरसह सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. शिवाय १३ वर्षीय लहान मुलाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

फ्लोरिडाहून डोमिनिकन रिपब्लिकमधील ला इजाबेला इथं विमान निघाले होते. विमानाने उड्डाण केले पण काही कारणास्तव त्याचे इमर्जन्सी लँडिग करत असताना अपघात झाला आणि यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT