America Fire Esakal
ग्लोबल

America Fire: अमेरिकेत पुन्हा गोळीबार! शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

टेक्सास येथे झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेरलं. पोलिसांनी हल्लेखोराला ठार झाल्याचं सांगितलं. मात्र, हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून ठार झाला की पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

टेक्सास येथे झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टेक्सासच्या मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज रविवारी टेक्सास प्रांतातील डॅलसजवळील अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. नंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT