GLOBAL SAKAL
ग्लोबल

संवाहकांचा शोध लावणाऱ्यांना ‘नोबेल’

ज्युलियस आणि पॅटापुटियन यांना वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

स्टॉकहॉम : मानवी शरीरात तापमान आणि स्पर्श यांची संवेदना ओळखणाऱ्या संवाहकांचा (रिसेप्टर) शोध लावल्याबद्दल अमेरिकेतील डेव्हिड ज्युलियस आणि अर्डम पॅटापुटियन या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने आज या पुरस्कारांची घोषणा केली.

त्वचेला उष्णतेची जाणीव करून देणाऱ्या मज्जासंस्था संवाहकांना ओळखण्यासाठी ज्युलियस यांनी कॅप्सेसिन या घटकाचा वापर केला. कॅप्सेसिन हा घटक मिरचीमध्ये आढळतो. तर, पॅटापुटियन यांनी दाबाची संवेदना ओळखणाऱ्या पेशींमधील संवाहकांचा शोध लावला. या दोघांनी त्यांचे संशोधन ‘सोमॅटो सेन्सेशन’ या क्षेत्रावर, म्हणजेच डोळे, कान आणि त्वचा या घ्राणेंद्रियांची पाहणे, ऐकणे आणि स्पर्श जाणवण्याच्या क्षमतेवर केंद्रीत केले होते. त्यांच्या या शोधामुळे निसर्गाचे एक गुपित जगासमोर उघड झाले असून हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे शोध आहेत, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. या शोधामुळे अनेक आजारांवर उपचार करणे सोपे जाणार आहे, असेही समितीने सांगितले. या दोघांना गेल्या वर्षीही संयुक्तपणे प्रतिष्ठेचा कावली पुरस्कार मिळाला होता.

नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याने दोघाही शास्त्रज्ञांना सुरुवातील आश्‍चर्याचा धक्का बसला, पण त्यांनी आनंद व्यक्त केला, असे समितीने सांगितले. सुवर्णपदक आणि एक कोटी स्विडीश क्रोनर (११ लाख ४० हजार डॉलर) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नोबेल पुरस्काराचे संस्थापक आल्फ्रेड नोबेल (मृत्यू १८९५) यांच्या संपत्तीमधून दरवर्षी पुरस्कारांचे वितरण केले जाते. या पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT