Nobel Prize in Physics jointly won by Alain Aspect John F Clauser Anton Zeilinger for experiments with entangled photons
Nobel Prize in Physics jointly won by Alain Aspect John F Clauser Anton Zeilinger for experiments with entangled photons  
ग्लोबल

Nobel Prize For Physics: भौतिकशास्त्राचे यंदाचे नोबेल तीन शास्त्रज्ञांना जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Nobel Prize For Physics: नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. आज भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने 2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. 'क्वांटम मेकॅनिक्स' या क्षेत्रातील कार्यासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सोमवारी (3 ऑक्टोबर) नोबेल पारितोषिकाच्या घोषणेची सुरुवात स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना त्यांच्या निअँडरथल डीएनएवरील शोधांसाठी वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मिळाल्याने झाली.

या आठवड्यात बुधवारी रसायनशास्त्राचे नोबेल आणि गुरुवारी साहित्याचे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी तर अर्थशास्त्राचा पुरस्कार 10 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

दरम्यान 2021 मध्ये, तीन शास्त्रज्ञांना - Syukuro Manebe, Klaus Hasselmann आणि Giorgio Parisi यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. निसर्गातील जटिल शक्ती समजून घेण्यासाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या शोधामुळे हवामानातील बदल समजण्यास मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT