noor-inayat-khan 
ग्लोबल

भारतीय वंशांच्या हेर नूर यांचा ब्रिटनमध्ये सन्मान; दुसऱ्या महायुद्धात धाडसी कार्य

पीटीआय

लंडन - दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नूर इनायत खान (१९१४-१९४४) यांच्या धाडसी कामगिरीचा गौरव म्हणून मध्य लंडनमधील त्यांच्या पारंपारिक निवासस्थानी नीलफलक लावण्यात आला आहे. अशा प्रकारचा सन्मान मिळवणाऱ्या त्या भारतीय वंशांच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

इंग्लिश हेरिटेज चॅरिटीमार्फत द ब्लू प्लाक स्किम (नील फलक योजना) राबवण्यात येते. या योजनेर्तंगत प्रसिद्ध, नामांकित व्यक्ती आणि संघटनेचा ब्रिटनमधील इमारतजवळ नीलफलक उभारून सन्मान केला जातो.  ‘नूर इनायत खान जीसी, १९१४-४४, एसओई’़ असे नीलफलकावर लिहण्यात आले आहे. 

इनायत खान यांच्या नावाचा नीलफलक ब्लूम्सबरी येथे फोर टेविटोन स्ट्रीटवर उभारला आहे. १९४३ रोजी फ्रान्ससाठी रवाना होण्यापूर्वी इनायत खान फोर टेविटोन स्ट्रीटवर राहत होत्या. त्या ब्रिटनच्या विशेष मोहिमेतंर्गत  (एसओई) रेडिओ संचालक म्हणून फ्रान्सला गेल्या होत्या. नाझीविरद्धच्या विशेष मोहिमेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. नूर या भारतीय सूफी संत हजरत इनायत खान यांची कन्या तसेच १८ व्या शतकातील म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्या वंशज होत्या. १९४४ रोजी जर्मन सैनिकांनी त्यांना पकडले आणि दावचू येथील छळछावणी येथे हत्या करण्यात आली. नूर यांनी मरेपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती उघड केली नाही. एवढेच नाही तर आपले खरे नाव देखील सांगितले नाही. इतिहासकार तसेच ‘स्पाय प्रिन्सेंस: द लाइफ ऑफ नूर इनायत खान’च्या लेखिका श्रावणी बसू यांनी म्हटले की, जेव्हा इनायत खान आपल्या शेवटच्या मोहिमेवर रवाना झाल्या तेव्हा त्यांनी एक दिवस आपण धाडसाचे प्रतिक होवू याचा विचार देखील केला नसेल. त्या असामान्य हेर होत्या. सूफी असल्यामुळे अहिंसा आणि धार्मिक सलोखा यावर त्यांचा विश्‍वास होता. लेखिका बसू यांनी एका लहान सोहळ्यात नीलफलकाचे अनावरण केले. त्या म्हणाल्या की, नूर यांच्या स्मरणार्थ उभारलेले नीलफलक हे त्यांच्या धाडसाचे प्रतिक आहे. या नीलफलकामुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल. बसू या नूर इनायत खान मेमोरियल ट्रस्ट (एनआयकेएमटी) च्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांनी २०१२ मध्ये गोर्डोन स्क्वेअर येथे नूर यांची प्रतिमा लावली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचाही सन्मान
यापूर्वी लंडन येथे वास्तव्य करणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही नीलफलकातून सन्मान केला आहे. लंडनमध्ये ज्या इमारतीत त्यांचे वास्तव्य होते, तेथे नीलफलक लावण्यात आले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT