Abdalla Hamdok esakal
ग्लोबल

लष्करानं देशाच्या पंतप्रधानांनाच नेलं पळवून

सकाळ डिजिटल टीम

उत्तर आफ्रिकेतील सुडान (Sudan) देशात राजकीय आणि आर्थिक संकट गडद होत चाललंय.

खारतूम : उत्तर आफ्रिकेतील (North Africa) सुडान (Sudan) देशात राजकीय आणि आर्थिक संकट गडद होत चाललंय. सरकारच्या निर्णयामुळं संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसताहेत. लोकांनी सैन्याकडं (Military) बंडाचं आवाहन केलं होतं. दरम्यान, सुडानचे पंतप्रधान अब्दुल्ला हमदोक (PM Abdalla Hamdok) यांना सुरक्षा दलाच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. 'रॉयटर्स'च्या माहितीनुसार, सुरक्षा दलानं पंतप्रधान, तसेच काही पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. या सर्वांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचंही समजतंय.

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या माहिती मंत्रालयानं पंतप्रधान अब्दुल्ला हमदोक यांना सोमवारी सशस्त्र दलांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. मंत्रालयानं एका निेवेदनात म्हटलंय, की जेव्हा हमदोक यांनी बंडाचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा सैन्य दलानं पंतप्रधान हमदोक यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अज्ञातस्थळी नेलं. सुडानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की लष्करी दलानं सोमवारी पाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलंय, तर लोकशाही समर्थक देशाचा मुख्य पक्ष असलेल्या सुडान प्रोफेशनल्स असोसिएशननं जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय. दरम्यान, सुडानमधील अनेक शहरांमध्ये इंटरनेटसेवाही बंद करण्यात आलीय.

दीर्घकाळ सत्ताधारी असलेले हुकूमशहा उमर अल-बशीर यांना सत्तेतून हटवल्यापासून देशात सतत वाद सुरुय. हा वाद लोकशाहीला मारक ठरत असून नागरिक आणि लष्करात खटके उडत आहेत. सुडानमध्ये सप्टेंबरमध्ये सत्तापालटाचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र, हे षडयंत्र कोणी केलं, याची नावं अद्याप उघड झालेली नाहीत. एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं, की षडयंत्रकर्त्यांनी राज्य मीडिया इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला, असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक काळ अध्यक्ष असलेले उमर अल-बशीर यांना दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये सत्तेवरून हटवण्यात आलं होतं. यानंतर सत्तेचं विभाजन करण्याचा करार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT