North Korea esakal
ग्लोबल

उत्तर कोरियानं समुद्रात पुन्हा डागली क्षेपणास्त्रं

सकाळ डिजिटल टीम

अण्वस्त्र सज्ज राष्ट्र होण्यासाठी उत्तर कोरिया (North Korea) सातत्यानं चाचण्या करत आहे.

अण्वस्त्र सज्ज राष्ट्र होण्यासाठी उत्तर कोरिया (North Korea) सातत्यानं चाचण्या करत आहे. अमेरिकेनं (America) दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मंगळवारी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. उत्तर कोरियानं समुद्रात एक बॅलेस्टिक मिसाइल डागलं आहे. दक्षिण कोरिया (South Korea) आणि जपानच्या सैन्यानं याची माहिती दिलीय.

अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोरणावर त्यांच्या रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करण्यास सुरुवात केलीय. त्यानंतर काही तासातच उत्तर कोरियानं समुद्रात मिसाइल डागलं आहे. एक महिन्याच्या कालावधीनंतर उत्तर कोरियानं पुन्हा एकदा मिसाइलच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनं बॅलेस्टिक मिसाइल कोणत्या प्रकारचं होतं याची माहिती दिलेली नाही. जपानच्या तट रक्षक दलानं तत्काळ त्यांच्या जहाजांना समुद्राच्या सुरक्षेबाबत इशारा देत सज्ज राहण्यास सांगितलं होतं.

असोसिएटेड प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं प्रायद्वीपच्या पूर्वेकडील समुद्रात प्रक्षेपणास्त्रं उडवल्याची माहिती दिलीय. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी केली. आता दोन्ही देशांच्या या चाचण्यांनंतर कोरियन द्वीपकल्पात शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झालीय, त्यामुळे चिंता वाढली असून उत्तर कोरियानं पुन्हा दक्षिण कोरियावर दबाव आणण्याची तयारी सुरु केलीय. उत्तर कोरियाला दक्षिण कोरियावर दबाव आणून अमेरिकेला त्याच्या मनासारखे काम करायला लावायचं आहे, असं नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT