Kim Jong Un esakal
ग्लोबल

जग तिकडे युद्धात व्यस्त; इकडे किम जोंग ऊननी केलं मिसाईलचं परीक्षण

सकाळ डिजिटल टीम

सियोल: संपूर्ण जगाचं लक्ष सध्या रशिया-युक्रेन युद्धावर लागून राहिलेलं आहे. यादरम्यानच आता उत्तर कोरियाने एका महिन्याच्या अवधीनंतर आज रविवारी समुद्रामध्ये एक बॅलिस्टीक मिसाईलचे परिक्षण केले आहे. याबाबतची माहिती कोरियाच्या शेजारी राष्ट्रांनी दिली आहे.

उत्तर कोरिया शस्त्रांमध्ये करतोय सुधारणा

यावर्षी उत्तर कोरियाने केलेलं हे आठवं शस्त्र परीक्षण आहे. तसेच 30 जानेवारीनंतर करण्यात आलेलं हे पहिलं परीक्षण आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, उत्तर कोरिया आपल्या शस्त्र तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहे. तसेच अमेरिकेसोबत मोठ्या काळापासून थांबलेल्या चर्चेच्या दरम्यान प्रतिंबधांपासून मुक्ती मिळावी, यासाठी दबाव निर्माण करत आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिका सध्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यस्त असतानाच उत्तर कोरिया वॉशिंग्टनवर दबाव वाढवण्यासाठी या काळाचा वापर करुन घेत आहे.

600 किलोमीटर उंचीपर्यंत गेली मिसाईल

यादरम्यान जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी सांगितलं की, उत्तर कोरियाच्या मिसाईलने पूर्व किनारा आणि जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर पडण्याआधी जवळपास 600 किलोमीटरच्या अधिक उंचीवर जवळपास 300 किलोमीटरपर्यंत उड्डाण घेतलं. त्यांनी म्हटलंय की, जहाजांना अथवा विमानांना कसल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये.

दक्षिण कोरियाने लावला शोध

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी देखील उत्तर कोरियाच्या राजधानीमधून मिसाईल परीक्षण होत असल्याच्या शोध घेतला आहे. आणि त्यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली तसेच खेदही व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT