China US Conflict.gif 
ग्लोबल

चीनच्या कुरापती सुरूच; आता 'या' मुद्द्यावरून अमेरिकेला डिवचले!

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग: कोरोनाच्या नंतर हॉंगकॉंगच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले असतानाच, आता तैवानच्या हक्कावरून चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या सैन्यदलाचे एक विमान तैवानच्या हवाई हद्दीतून गेल्यामुळे चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे. चीनने अमेरिकेच्या या कृतीबद्दल जोरदार आक्षेप घेत विरोध केला आहे.    
 
चीनच्या हॉंगकॉंग विषयक नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे. हॉंगकॉंगचे स्वातंत्र्य गिळंकृत केल्यानंतर चीनच्या ड्रॅगनने आता तैवानच्या मालकी हक्कावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या सैन्यदलाचे बोईंग ७३७ जातीच्या सी- ४० ए या विमानाने तैवानच्या हवाई हद्दीतून परवानगीसह उड्डाण केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली होती. त्यानंतर चीनने अमेरिकेच्या या हालचालीबद्दल नाराजी व्यक्त करत, अमेरिकेच्या सैन्यदलाची ही कृती चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे म्हणत, चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले असल्याचा आरोप देखील चीनने केला आहे.              
  
जपानच्या ओकिनावा बेटावरुन अमेरिकेच्या विमानाने उड्डाण भरत, दक्षिण-पूर्व आशियाकडे जाण्यासाठी तैवान बेटाच्या काही क्षेत्रातून मार्गक्रमण केल्याचे समजते. चीन हा पूर्वीपासूनच तैवान बेट आपल्या देशाचा एक भाग मानतो. त्याचमुळे चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी तैवानच्या समस्येवर अधिक संवेदनशीलता दाखवत, तैवानला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांवर टीका करत आलेला आहे. याच कारणामुळे चीनने अमेरिकेवर आज देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर हल्ला  केला असल्याचे सांगत, ही घटना गंभीर आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. 

तैवान हे १९५० सालापासून स्वतंत्र्य लोकशाही व्यवस्था असणारे चीनच्या जवळील बेट आहे. मात्र चीन तैवानवर मालकी हक्क सांगत आलेला असून, वेळ पडल्यास लष्करी कारवाई करून तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करण्याची धमकी चीन यापूर्वी देत आला आहे. तसेच तैवानशी इतर कोणत्याही देशांनी राजनयिक संबंध ठेवल्यास त्या देशासोबत आपले संबंध तोडण्याचा इशारा देखील चीनने याअगोदर दिला आहे.        

दरम्यान, चीनच्या हॉंगकॉंग संबंधित कायद्याविरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, जपान व अन्य युरोपीय राष्ट्रांनी जाहीर निषेध नोंदवला होता. त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी वेळोवेळी चीनची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. तर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला वारंवार यासंबंधात इशारा दिला होता. मात्र प्रत्येक वेळेस चीनने हाँगकाँग हे संपूर्णपणे चीनचे अंतर्गत प्रकरण असल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT