Nuclear War Sakal
ग्लोबल

अणुयुद्ध टाळण्याचा महाशक्तींचा निर्णय

पाच प्रमुख अण्वस्त्रक्षम देशांकडून संयुक्त निवेदन प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अण्वस्त्र स्पर्धेचा धोका मोठा असल्याचे आज पाच मोठ्या अण्वस्त्रक्षम देशांनी मान्य केले आहे. अमेरिका, चीन, रशियासह ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत अणुयुद्ध (Nuclear War) आणि अण्वस्त्र स्पर्धा टाळण्याचे आवाहन जगाला केले आहे. तसेच, अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही देशाविरोधात करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सर्वाधिक अण्वस्त्र क्षमता असलेल्या देशांनी प्रथमच एकत्र येत असे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘अण्वस्त्रक्षम देशांमध्ये अणुयुद्ध टाळून धोका कमी करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. अण्वस्त्रांच्या साह्याने लढले गेलेले युद्ध कधीही जिंकता येत नाही आणि असे युद्ध कधीही सुरु होता कामा नये. अण्वस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम मोठे आहेत. त्यामुळे जोपर्यंत अण्वस्त्रे अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांचा वापर केवळ संरक्षणासाठीच आणि युद्ध टाळण्यासाठीच केला जावा,’ असे पाचही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

अण्वस्त्र प्रसार थांबविणे आवश्‍यक आहे, असे मान्य करणारे हे पाचही देश संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे कायमस्वरुपी सदस्य आहेत.

संयुक्त निवेदनातील मुद्दे

  • अण्वस्त्रांमुळे निर्माण होणारे धोके कमी करणार

  • अण्वस्त्रप्रसार बंदीवर भर अण्वस्त्रांचा वापर टाळणार

  • इतर सर्व देशांशी सहकार्य करत सुरक्षित वातावरण निर्माण करणार

अण्वस्त्र क्षमतेचा विस्तार नाही : चीन

बीजिंग : चीन अण्वस्त्र क्षमता वेगाने वाढवित असल्याचा अमेरिकेचा दावा चीनने आज फेटाळून लावला. आम्ही अण्वस्त्रे अधिक आधुनिक करत असलो तरी त्यांची संख्या वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. चीनकडे २०३० पर्यंत एक हजारांहून अधिक अण्वस्त्रे असतील, असा अंदाज अमेरिकेने नुकताच व्यक्त केला होता. अमेरिकेकडे अधिकृतरित्या ३,७५० अण्वस्त्रे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT