ear infection Esakal
ग्लोबल

Omicronच्या संसर्गाची नवी लक्षणं! कानदुखीच्या तक्रारी वाढल्या

स्टँडफोर्ड विद्यापीठात यासंबंधी अभ्यासातून कानासंबंधीच्या तक्रारी वाढत असल्याचं समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सध्या धुमाकूळ घातला आहे. या व्हेरियंटच्या सामुहिक संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता आणखी एक काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये नवी लक्षणं दिसून आली आहेत. यामध्ये कानदुखीच्या घटनांची संख्या मोठी आहे. स्टँडफोर्ड विद्यापीठाला संशोधनादरम्यान ही नवी लक्षणं आढळून आली आहेत. (Omicron variant a new symptom discovered and it may attack your ears)

ओमिक्रॉनची नवी लक्षणं काय आहेत?

कोरोनाच्या संसर्गादरम्यान जेव्हा ओमिक्रॉन व्हेरियंट समोर आला तेव्हा शरीरातील अनेक भागांवर त्याचा परिणाम जाणवत होता. यामध्ये डोळे, हृदय, मेंदूचा देखील समावेश आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते यामध्ये कान या अवयवाचाही समावेशही झाला आहे. त्यांनी काही संसर्गबाधितांकडून तक्रारी आल्या की, त्यांना कानदुखीचा त्रास होत आहे, तसेच कानात आतून मुंग्या, कानाला बधिरता आल्यासारखं भासत आहे. अद्याप याचा अधिकृत खुलासा झालेला नाही की ओमिक्रॉनची ही लक्षण आहेत. पण ही लक्षण भासत असल्यास कोविडची चाचणी करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांमध्येही अशी लक्षणं आढळून आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT