3.2 million people left Ukraine  सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

Ukraine Russia War : तीन लाख युक्रेनियन लोकांनी सोडला देश

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन युद्धाने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. अजूनही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला. यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले असून एकूण ३.२ दशलक्ष लोकांनी आधीच देश सोडला आहे.

यू.एन. स्थलांतर एजन्सीच्या अंदाजानुसार रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत तर ३.२ दशलक्ष आधीच देश सोडून पळून गेले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचे जनजीवन पुर्णपणे विस्कटले असून मोठ्या प्रमाणावर तेथील जीवितहानी झाली.

युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांच्या स्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये चिंता व्यक्त केली. युक्रेनमधून आतापार्यंत २२ हजारांहून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणल्याचेही भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी सांगितले.

अमेरिका, ब्रिटनसह सहा देशांच्या विनंतीवरुन आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये युक्रेनमधील नागरिकांच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये तिरूमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. ‘युक्रेनमध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पुरविली जात असताना ती मानवता, समभाव आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारलेली असावी, त्यात राजकारण असू नये. या देशातील नागरिकांची सध्याची स्थिती अत्यंत बिकट असून जगाने त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्‍यक आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच, युक्रेनवर युद्धाचे ढग जमा होण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २२ हजार ५०० भारतीयांना मायदेशी आणले असून १८ देशांमधील नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्यात भारताने मदत केली आहे, अशी माहितीही तिरूमूर्ती यांनी सुरक्षा समितीमध्ये दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT