Measles Patient esakal
ग्लोबल

धोका वाढला! एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो संक्रमित; WHO चा महत्वाचा इशारा

कोरोनाचं संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचं संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

कोरोनाचं संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. सध्या जग कोरोनाच्या (Coronavirus) महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसची लस घेण्याच्या प्रक्रियेत जग इतकं व्यस्त झालं की, जगभरातील मुलांच्या लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे.

अनेक देशांच्या लसीकरण कार्यक्रमाची पायाभूत सुविधा कोविड लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यात व्यस्त होती. त्यामुळं आता गोवरनं (Measles Patient) पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून धोका वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार, जगातील 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही, तर 1.5 कोटी मुलांना दुसरा डोस मिळू शकलेला नाही. 2021 मध्ये गोवरची सुमारे 90 लाख प्रकरणे नोंदवली गेली आणि 1 लाख 28 हजार मृत्यूची नोंद झाली.

22 देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. प्रथम कोरोना व्हायरसच्या लसीकरणामुळं गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि नंतर 2022 पर्यंत जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला. अलीकडं, गोवरचा उद्रेक लाखो जीव धोक्यात आणत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलंय की, एका प्रकरणामुळं 12 ते 18 जणांना या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. ही परिस्थिती बिकट होत असल्यानं यूएन आरोग्य संस्थेनं निदर्शनास आणलं की, गेल्या वर्षीही विषाणूचा रोग तितकाच तीव्र होता. कोविड-19 विरुद्धच्या लसी विक्रमी वेळेत विकसित केल्या गेल्या, पण लाखो मुलं प्राणघातक रोगांविरुद्ध जीवनरक्षक लसीकरणापासून वंचित राहिली. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले, लसीकरण मोहीम पुन्हा रुळावर आणणं अत्यंत आवश्यक आहे. या अहवालातील प्रत्येक आकडेवारीच्या मागं एक प्रतिबंधित रोगाचा धोका आहे."

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याच्या नादात 18 देशांमध्ये 6 कोटी डोस एकतर चुकले किंवा त्याला विलंब झाला आहे. गोवरचा व्हायरस हा सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानला जातो. पण चांगली गोष्ट ही आहे की लसीकरणाद्वारे हा रोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो. हा व्हायरस पसरू नये म्हणून, जगातील 95% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळणे आवश्यक मानले जाते. परंतु प्रत्यक्षात फक्त 81% मुलांना गोवरचा पहिला डोस मिळाला आहे आणि फक्त 71% मुलांना दोन डोस मिळाले आहेत. 2008 नंतर इतक्या कमी लसीकरणाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT