Narendra Modi and Elon Musk 
ग्लोबल

Twitter : ट्विटर विकत घेणाऱ्या इलॉन मस्क यांना भारताकडून इशारा; म्हटलं, आमचे...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतलं आहे. इलॉन मस्क यांनी १३ एप्रिल रोजीच ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. मस्क यांच्या ट्विटर अधिग्रहणानंतर भारताकडून महत्त्वपूर्ण विधान समोर आलं आहे. (Twitter news in Marathi)

आयटी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, ट्विटर आगामी काळात भारतातील नवीन आयटी कायद्यांचे पालन करेल, अशी आमच्या देशाला अपेक्षा आहे. तसेच आशा आहे की, ट्विटरची मालकी बदलल्यानंतरही भारतासाठीचे नियम बदलणार नाहीत.

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, ट्विटरचा मालक बदलण्याची पर्वा नाही. भारताचा स्वतःचा कायदा आहे, प्रत्येकाला इथला कायदा पाळावाच लागेल. काही भारतीयांच्या ट्विटर अकाऊंटवरील बंदीबाबत ते म्हणाले की, एक-दोन दिवसांत यासंदर्भात नवीन आयटी नियम लागू करण्यात येईल, जे सर्वांना पाळावेच लागेल.

ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यात 7 महिने हा करार सुरू होता. अखेर गुरुवारी या कराराला अंतिम रुप आले. ट्विटरचे प्रमुख होताच एलन मस्क यांनी सर्वप्रथम सीईओ पराग अग्रवाल यांना हटवलं. मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नेड सहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गडदे या आणखी दोन अधिकाऱ्यांनाही त्यांनी बाजुला केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : आंतरराज्य घरफोडी, चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून अटक

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT