Corona in china  Corona in china
ग्लोबल

शांघाय शहर बनले ‘हॉटस्पॉट’; चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप

सकाळ डिजिटल टीम

चीन सध्या कोरोनाच्या (corona) प्रकोपाचा सामना करीत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करूनही कोरोनाचे रुग्ण कमी होत नाही आहेत. सध्या शांघाय शहर हे चीनचे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. शनिवारी शहरात कोरोनाचे २,६७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. जी आदल्या दिवसाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहे.

२६ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघाय शहरात तीन दिवसांत कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. वृत्तसंस्था एफपीच्या म्हणण्यानुसार, जागतिक शिपिंग हब म्हणून शांघायची भूमिका पाहता अधिकाऱ्यांनी शहरावर लॉकडाउन लादण्यास नकार दिला आहे. असे केल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे चिनी प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, जनतेसाठी काही आवश्यक निर्बंध लादण्यात आले आहेत.

हाँगकाँग विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, चीनची कोरोना लस सिनोव्हॅक ओमिक्रॉन विरुद्ध प्रतिपिंड विकसित करण्यात अयशस्वी ठरली आहे. शिवाय ज्यांना या लसीचे दोन डोस आधीच दिले गेले आहेत अशा लोकांना वाचवण्यातही ते अयशस्वी ठरले. २०२१ पर्यंत चीनच्या १.६ अब्ज लोकसंख्येला २.६ दशलक्ष पेक्षा जास्त डोस प्रशासित केले गेले आहेत.

लस घेतल्यानंतरही मृत्यू

सरकारी अहवालानुसार, सिनोव्हॅक या चिनी लसीचे दोन डोस (vaccine) घेतल्यानंतर ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन टक्के लोकांचा मृत्यू झाला. एकच डोस घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सहा टक्के आहे. दरम्यान, शांघाय संसर्गजन्य रोग तज्ञ झांग वेनहॉन्ग यांनी लोकांना सामान्य जीवन राखण्यासाठी विषाणूविरोधी उपायांमध्ये संतुलन राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT