US Dairy Farm Fire 
ग्लोबल

Dairy Farm Fire: डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट! १८ हजार गायींचा वेदनादायक मृत्यू

Sandip Kapde

अमेरिकेतील टेक्सास येथील एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटोमुळे १८ हजार गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे ढग पसरले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी हा स्फोट झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. आग रौद्ररुप धारण करेल याची कल्पना कुणालाही नव्हती. जेव्हा आग ओसरत होती तेव्हा गायींचे मृतदेह दिसायला लागले. यावेळी लोकांचे डोळे पाणावले. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे १८ हजार गायींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

बहुतेक गायी होल्स्टीन आणि जर्सी गायी होत्या. स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची भीती व्यक्त होत आहे. टेक्सासचे अग्निशमन अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करतील.

आग ऐवढी भीषण होती की गायींना बाहेर काढण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यामुळे या आगीत ९० टक्के गायींचा मृत्यू झाला. एका अंदाजानुसार, एका गायीची किंमत सरासरी २००० डॉलर (दीड लाख रुपयांपेक्षा जास्त) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

FDA Action: काजू कतलीत अळ्या अन् गोदामात झुरळे; एफडीएची Reliance Retail, Blinkit आणि Amazonवर कडक कारवाई!

गोविंदाने नर्मदा नदीत उतरत जीव देण्याचा केलेला प्रयत्न, म्हणाला, “सगळं संपलं होतं आणि…”

Marathi News Live Updates : ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला वेठीस धरले’; खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT