बार्सिलोना - कोरोनाच्या जागतिक साथीचा फटका बसल्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी टॅक्सीचालकांनी सोमवारी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. (एएफपी) 
ग्लोबल

स्पेनमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा आदेश लागू

यूएनआय

माद्रिद - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे स्पेनमध्ये रात्री देशव्यापी संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पुढील सहा महिने हा आदेश लागू राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनी रविवारी हा निर्णय जाहीर केला. त्याच रात्री तो लागू झाला. देशातील रुग्णालयांमधील सेवा कोलमडू नये म्हणून राष्ट्रीय आणीबाणीही जाहीर करण्यात आली. रात्री 11 ते पहाटे सहा या कालावधीत नोकरी-व्यवसायासाठी प्रवास, औषध खरेदी, वृद्ध आणि लहान मूलांच्या गरजा अशा कारणांशिवाय कुणीही बाहेर पडू शकणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

17 प्रांत तसेच दोन स्वायत्त शहरांमधील प्रशासनास रात्री दहा ते 12 व पहाटे 5 ते सकाळी सात या वेळेत संचारबंदीचा कालावधी नक्की करण्याचा अधिकार राहील. एकत्र न राहणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येण्याची कमाल मर्यादा सहा असेल.

स्पेनने देशव्यापी आणीबाणी लागू करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मार्चमध्ये सुरू झालेली आणीबाणी सहा आठवडे चालली होती. सुमारे चार कोटी 70 लाख लोकसंख्या असलेल्या देशात दुसऱ्यांदा लॉकडाउन लागू करावे लागू नये म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी लागू करावी अशी मागणी आरोग्य व्यवस्था चालविणाऱ्या अनेक प्रांतीय नेत्यांनी केली होती.

यावेळी सेवानिवृत्त नागरिकांसाठीच्या केंद्रांमध्ये सरस तयारी झाली असून रुग्णालयांमधील नव्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी वेगाने वाढत आहे.

स्पेन तसेच युरोप संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वेढला गेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आपण सध्या राहात असलेली स्थिती टोकाची आहे. जिवीतहानी कमीत कमी झाली पाहिजे, त्याचवेळी अर्थव्यवस्थेचेही रक्षण करावेच लागेल.
- पेड्रो सँचेझ, स्पेनचे पंतप्रधान

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजेंना मारलं कुणी? पद्मसिंहांच्या लेकानं १९९० ते २००९ पर्यंतचं राजकारण काढलं बाहेर, षडयंत्र असल्याचा आरोप

Railway Fine: बिनतिकीट प्रवाशांवर मोठा दणका! नियम मोडल्यास दुप्पट पैसे आकारणार; रेल्वे प्रशासनाकडून नवे दंड जाहीर

Pavanraje Nimbalkar : माफीचा साक्षीदार कोण, ज्याच्यामुळे बदलला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल

Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO साठी Jio चा सेबीकडे अर्ज! Meta-Googleचाही विश्वास; अंबानींचा मास्टरप्लॅन काय?

एंट्री होणार तितक्यात माझ्या पायजम्याची नाडी तुटली... मग काय केलं? अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT