Oxfam conclusion Corona adds up billionaire in 30 hours inflation tax on rich people sakal
ग्लोबल

‘ऑक्सफॉम’चा निष्कर्ष; कोरोनामुळे दर ३० तासांत एका अब्जाधीशाची भर

दारिद्र्यातही मोठी वाढ; दहा लाख लोकांना महागाईचा फटका

सकाळ वृत्तसेवा

दावोस (स्वित्झर्लंड) : कोरोनाच्या महासाथीने दर ३० तासांत एक नवीन अब्जाधीश निर्माण केला आहे आणि आता दहा लाख लोक त्यात गतीने दारिद्र्यात लोटले जाऊ शकतात, असे प्रतिपादन ‘ऑक्सफॉम’ या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने सोमवारी केले. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा दावोस समितीची बैठकीचे आयोजन केले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) बैठकीसाठी जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित वर्ग एकत्र आला आहे. त्यामध्ये मत मांडताना ‘ऑक्सफॉम’ने म्हटले आहे की, गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे.

यावर्षी २६.३ कोटी लोक दारिद्र्य पातळीच्या खाली आले आहेत. तुलनात्मकरीत्या कोरोनासाथीच्या काळात ५७३ लोक अब्जाधीश बनले आहेत किंवा दर ३० तासाला एक व्यक्ती धनाढ्य बनले आहेत. कोरोनाकाळात वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक खर्चाचे संकट मोठे होते. संपत्तीत अविश्वसनीय वाढ झाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी अब्जाधीश दावोसला पोहोचत आहेत, असे ‘ऑक्सफॉम’च्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी सांगितले. आधी कोरोनाची साथ आणि आता अन्नधान्य व ऊर्जेच्या किमतीत झालेली मोठी वाढ त्यांच्यासाठी ‘बोनस’ आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘ऑक्सफॉम’चे मत

  • कोरोनातील महागाईचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदतीसाठी श्रीमंतांवर ‘एकता कर’ लागू करावा.

  • नफाखोरी थांबविण्यासाठी बड्या उद्योगांच्या अनपेक्षित नफ्यावर ९० टक्के तात्पुरता जादा नफा कर लादावा.

  • कोट्यधीशांच्या संपत्तीवरील २ टक्के आणि अब्जाधीशांवरील पाच टक्के वार्षिक करातून दर वर्षी दोन हजार ५२० अब्ज डॉलर एवढा निधी जमा होईल.

  • या संपत्ती कराचा वापर २.५ अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी करता येईल.

  • या पैशातून जगात पुरेशा लशी उपलब्ध करता येतील.

  • गरीब देशांमधील सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठीही त्याचा उपयोग करता येईल.

दारिद्र्य कमी करण्याच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांना यश आले असतानाच आता उलट परिणाम दिसत आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच्या खर्चात अशक्य वाढ झाल्याने लाखो लोकांसमोर संकट निर्माण झाले आहे.’’

- गॅब्रिएला बुचर, कार्यकारी संचालक, ऑक्सफॉम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT