ग्लोबल

दाऊदचा व्याही मियाँदाद म्हणतो, 'पाकने अणुबॉम्ब टाकून भारत नष्ट करावा'

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानने अणुबॉंब टाकून भारताला नष्ट करावे असे प्रक्षोभक विधान पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार जावेद मियॉंदाद याने केले आहे. मियॉंदादचा मुलगा जुनैद याचा दाऊदची मुलगी महारुखशी विवाह झाला आहे. मियॉंदाद हे वक्तव्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पण तो नेमके केव्हा हे बोलला हे स्पष्ट होत नाही.  

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे 370वे कलम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रद्द केले. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक तज्ञ बिथरले आहेत. यात क्रिकेटच्या मैदानावर भारताला प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर शत्रू समजून खेळलेल्या मियॉंदादची भर पडली आहे. तो आपल्या देशाला उद्देशून म्हणाला की, तुमच्यापाशी परवाना असलेले शस्त्र असल्यास तुम्ही हल्ला केला पाहिजे. तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही लोकांना मारून टाकू शकता असा नियम जगभर चालतो. त्यांच्या मेलेल्या (जवानांचे) मृतदेह घरी पाठवले जातील तेव्हा त्यांना (भारतीयांना) वेदना होतील. 

भारताच्या पंतप्रधानांना कोणता संदेश देशील, या प्रश्नावर मियॉंदाद म्हणाला की, भारत हा फार लबाड देश आहे. आम्ही अणुबॉंब उगाचच ठेवलेले नाहीत, आम्ही त्याचा भारतावर वर्षाव करू. अणुबॉंब टाकून भारत संपवून टाकू. 

मोदी यांच्या यॉर्करवर पाकिस्तानची दांडी उडाल्यानंतर सर्फराज नवाझ, शोएब अख्तर आणि शाहीद आफ्रिदी यांनीही भारतविरोधी विधाने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT