Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi 
ग्लोबल

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य

तालिबानला दिली क्लीनचीट

दीनानाथ परब

काबूल: दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी पाकिस्तान जगभरात ओळखला जातो. पाकिस्तान त्यासाठीच बदनाम आहे. पण पाकिस्तानचे नेते त्यातून काहीही शिकले आहेत, असं वाटत नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री (Pak foreign minister) शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे विधान करताना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. शाह महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानातील हिंसाचारासाठी तालिबानला (taliban) क्लीनचीट दिली आहे आणि उलट भारतावर अफगाण भूमीतून दहशतवादी कारवाया (terror act) करत असल्याचा आरोप केला आहे. कुरेशी यांच्या या विधानामुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडू शकतात. (Pak foreign minister clears Taliban of violence accuses India of terror acts)

या वक्तव्यानंतर कुरेशी यांच्यावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून टीका सुरु आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कुरेशी यांनी हे विधान केले. चॅनलच्या टि्वटरवर या मुलाखतीचे प्रोमो प्रक्षेपित झाले आहेत. अफगाणिस्तानात मोठया प्रमाणावर हिंसाचार सुरु असतो. तिथे होणारे बॉम्ब स्फोट, सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्यांसाठी तालिबानला जबाबदार धरलं जातं, असा प्रश्न कुरेशी यांना विचारला.

त्यावर त्यांनी "यासाठी कोण जबाबदार आहे? तालिबानमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे, असं चित्र तुम्ही निर्माण करत असाल, तर ती अतिशयोक्ती ठरेल. मी असं का म्हणू? तिथे परिस्थिती खराब करणारे दुसरे अन्य घटक नाहीयत का?" असा प्रतिप्रश्न केला. "डाइश सारख्या संघटना अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहेत. वॉर इकोनॉमी म्हणजे ज्यांना युद्धजन्य परिस्थितीमधून स्वत:चा फायदा करुन घ्यायचा असतो. त्यांना फक्त सत्ता हवी असते" असे कुरेशी म्हणाले.

अफगाणिस्तानातील भारताच्या उपस्थितीवरही कुरेशी यांनी भाष्य केले आहे. अफगाणिस्तानात भारतीयांची जितकी उपस्थिती असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त संख्येने राहत आहेत आणि अफगाण भूमीवरुन ते दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अफगाणिस्तानात भारताचे किती दूतावास आहेत? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्यांनी कागदावर चार दिसतात, असे उत्तर दिले.

या आकड्याबद्दल तुमच्या मनात कुठली शंका आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, "तुमची सीमा भारताला लागून नाहीय. अशावेळी तुमचे त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध आहेत आणि तुम्हाला द्विपक्षीय संबंध ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा त्यांच्याशी व्यापार चालतो. ते इथे येऊन विकास कामे करतात, त्यावर आम्हाला काही हरकत नाही. पण इथे असणाऱ्या भारतीयांची संख्या जितकी असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त आहे कारण भारताची सीमा अफगाणिस्तानला लागून नाहीय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

पतीला प्रेयसीसह रंगेहात पकडलं, संतापलेल्या बायकोनं रस्त्यावरच चपलांनी हाणलं, प्रेयसी लॉजमधून पसार; VIDEO तुफान व्हायरल

सात महिन्यांनी आला, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला अन् रोहित शर्मा जगात भारी ठरला... ICC ची मोठी घोषणा, शुभमन गिलला केलं रिप्लेस

हॉटेलचं बिल पाहून गुजराती पर्यटकांनी पळ काढला, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली अन् फजिती झाली Video Viral

IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे

SCROLL FOR NEXT