esakal
ग्लोबल

VIDEO: 'भांडे घासून ये'म्हणणाऱ्या युझरला पाकच्या मुलीने दिले सडेतोड उत्तर.. होतंय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

Pak Influencer Sassy Reply Bartan dho jaker

नवी दिल्ली- सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्डिडिओला खूप पसंद करत असून यातून पुरुषांनी बोध घ्यावा असं म्हणत आहेत. व्हिडिओ पाकिस्तानमधील एका सोशल मीडिया स्टारचा आहे. मुलगी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन कोणताही प्रश्न विचारण्यास सांगते. यावेळी एक युझर तिला 'जाऊन भांडे घासून ये' म्हणतो. यावर ती मुलगी जे करते त्यावरुन तिचे कौतुक होत आहे.

कशफ अली नावाची पाकिस्तानी मुलगी लाईव्ह येते आणि काहीही विचारा असं युझर्संना आवाहन करते. यावर अनेकजण तिला उलटसुलट प्रश्न विचारतात. एकाने तिला अपमानास्पदरीत्या आधी जाऊन भांडे घासून ये असं म्हणतो. मुलगी लगेच युझरला आपल्या कृतीतून उत्तर देते. लगेच ती आपल्या किचनमध्ये जाते आणि लाईव्ह कॅमेरासमोर भांडे घासायला लागते. हे सगळं ते युझर्सना दाखवते.

भांडे घासणे झाल्यानंतर ती लगेच त्या युझरला उत्तर देते. ती म्हणते, 'मी भांडे घासले. असं करुन मी एक व्यक्ती म्हणून दुय्यम होते का? नाही ना, नेमकं काय झालं? एक काम होतं, ते मी केलं. महिलांसाठी अपमानजनक म्हणून तुम्ही या शब्दांचा का वापर करता? किचनमध्ये जा, भांडे घास. हे काय आहे? थोडं डोकं वापरा. जेवल्यानंतर भांडे घासावेच लागतील ना. प्रत्येकवेळी नवे भांडे घेणे परवडतं का? ही गोष्ट पण तुम्हाला समजवावी लागेल का?'

कशफ अली हिच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिचे कौतुक केलं. सोशल मीडियावर अनेकांनी तिचं समर्थन केलंय. लैंगिक समानतेचा खूप मोठा मुद्दा तिने उपस्थित केला, असं एकाने म्हटलं. दुसऱ्या एका युझरने म्हटलं की, 'एखादी शिवी दिल्याप्रमाणे महिलांविरोधात अशा शब्दांचा का वापर केला जातो. भांडे घासण्यात अपमानास्पद काय आहे?'

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना अनेकदा टाळलं जातं. कारण असे लोक भरपूर असतात आणि त्यांना विनाकारण महत्व देणं अनेकजण टाळतात. पण, काही वेळा उत्तर देणं गरजेचं होत. अशीच वेळ कशफ अली हिच्यावर आली. तिने युझरला सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावरुन तिला कौतुकाची थाप दिली जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT