ग्लोबल

अभिनंदन यांना वीरचक्र; पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

सकाळ डिजिटल टीम

अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यातं आलं. मात्र यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलातील प्रमुख पायलट आणि ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ १६ लढाऊ विमान पाडलं होतं. आता अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यातं आलं. मात्र यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने याआधीही भारतावर वेगवेगळे आरोप केले आहेत. तसंच सत्य झाकून काल्पनिक गोष्टी जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आताा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने वक्तव्य करताना म्हटलं की, भारताने अभिनंदन वर्धमान यांचा केलेला गौरव चुकीचा आहे. शौर्याचा काल्पनिक गौरव असल्याचंही पाकने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदन वर्धमानचा भारताने केलेला गौरव हा लष्कराच्या आचार संहितेविरोधात असल्याचं म्हटलं आहे. अभिनंदन वर्धमानला पाकिस्तानी सैन्याने पकडण्याआधी त्यांनी पाकिस्तानचं एफ १६ लढाऊ विमान पाडलं नव्हतं असंही त्यामध्ये म्हटलं आहे.' पाकिस्तानने यापूर्वीही त्यांचे एफ १६ लढाऊ विमान अभिनंदनने पाडलं नसल्याचं सांगितलं आहे.

पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांनी त्यांचे विमान पाडले नसल्याचा दावा करताना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या स्टेटमेंटचा दाखला दिला आहे. यामध्ये अमेरिकेच्या अधिकाकाऱ्यांनी दिलेल्या वक्तव्याचाही समावेश आहे. भारताचे हवाईदल हे पराभूत झाले होते, तसंच भारताने रचलेली कथा हास्यास्पद असून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ती विश्वासार्ह नसल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

अभिनंदन वर्धमान यांचे सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील तिसरं सर्वोच्च लष्करी वीर चक्राने सन्मानित केलं. नोव्हेंबरमध्ये त्यांना विंग कमांडरवरून ग्रुप कॅप्टनपदी पदोन्नती देण्यात आली होती.अभिनंदन 27 फेब्रुवारी 2019 रोजी श्रीनगरमधील 51 स्क्वॉड्रनचा भाग होता आणि पाकिस्तानी हवाई दलाने सुरू केलेला हवाई हल्ला हाणून पाडण्यासाठी त्याने उड्डाण केलं होतं. भारताने जैश-ए-द्वारा चालवल्या जाणाऱ्या खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये अभिनंदनला तत्काळ लँडिंग करावं लागलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक; बावनकुळेंच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन

Chiplun Mandal Officer Bribe Case : 10 हजारांची लाच स्वीकारताना चिपळूणचे मंडळ अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; जमीन खरेदीच्या नोंदीसाठी घेतले होते पैसे

Onion Price Hike: कांदा पुन्हा महागला! घाऊक दर ४४ रुपये किलो, किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत झेप

Marathi News Live Updates : भारताची ७.८% वाढ उल्लेखनीय: अमेरिकेतील गुंतवणूकदार परिषदेत अर्थमंत्री सीतारामन यांचे गौरवोद्गार

Santosh Pandit: पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना अटक, पोलिसांची कारवाई; स्वतःलाच मारहाण अन् शिवीगाळ... मध्यरात्री घडला थरार

SCROLL FOR NEXT