Afghanistan Taliban Viral Video eSakal
ग्लोबल

Pak Vs Afg : तालिबानला सहन होईना पाकिस्तानचा पराभव, विजय साजरा करणाऱ्या अफगाणी नागरिकांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

अफगाणी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या देशातच हा विजय साजरा करणं अवघड झालं आहे.

Sudesh

आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सोमवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला धूळ चारत विश्वचषकातील आपला दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव ठरला. अफगाणिस्तानच्या या विजयाचं सेलिब्रेशन जगभरात ठिकठिकाणी पहायला मिळालं.

कित्येक ठिकाणी पाकिस्तानच्या पराभवामुळे आनंद साजरा केला गेला, तर कित्येक ठिकाणी अफगाणिस्तान विजयी झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. मात्र, अफगाणी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या देशातच हा विजय साजरा करणं अवघड झालं आहे. याला कारण ठरतायत तालिबानी समर्थक.

तालिबान समर्थक अफगाणी नागरिकांना विजयाचा आनंदही साजरा करू देत नसल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमधून स्पष्ट होतंय. एका व्हिडिओमध्ये दिसतंय, की एक अफगाणी व्यक्ती आपल्या गाडीमधून फटाके वाजवत जात आहे. तर, त्याचवेळी एक तालिबानी त्याला अडवून, आपल्या हातातील काठीने त्याला मारहाण करत आहे. हबीब खान नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने आतापर्यंत एकदाही इंटरनॅशनल वनडे क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानला हरवलं नव्हतं. त्यामुळे सोमवारचा विजय हा पहिलाच, आणि तोही वर्ल्डकपमधील असल्यामुळे भरपूर मोठा होता.

गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानला सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. या सगळ्यातच क्रिकेटमधील हा विजय त्यांच्यासाठी आनंदाचे काही क्षण घेऊन आला आहे. त्यातही तालिबान त्यांना विजयोत्सव साजरा करण्यापासून अडवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT