IMRAN KHAN FRANC24
ग्लोबल

पाकिस्तानला मोठा धक्का; ‘ग्रे लिस्ट’मधील समावेश कायम

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) ठपका ठेवलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या पाकिस्तानला वित्तीय कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) ‘ग्रे लिस्ट’मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिसमध्ये संघटनेच्या व्हर्चुअल बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे एफएटीएफ संस्थेचे अध्यक्ष मार्कुस प्लेअर यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर हा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जातो. जर्मनीच्या अध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये पार पडलेल्या एफएटीएफ संस्थेच्या पाच दिवसीय बैठकीत या निर्णय घेण्यात आला. दहशतवाद्यांना होत असलेला वित्तपुरवठा रोखण्यात पाकिस्तानला अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यामुळेच त्यांचा ग्रे लिस्टमधील समावेश कायम ठेवला आहे.

जमात-ऊद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने शुक्रवारी घेतला. वित्तीय कारवाई कृती दल म्हणजेच एफएटीएफ ही मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याविरोधातील जागतिक संघटना आहे.

2018 मध्ये पाकिस्तानला 27 मुद्द्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानने 26 मुद्द्यांचीच पूर्तता केली आहे. यूएनने जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या हाफीज आणि मसूदवर कारवाई करावी, असे एफएटीएफने पाकिस्तानला सांगितले होते. पण पाकिस्तानने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मनीलॉण्डरिंगच्या धोक्याला आळा घालण्यात पाकिस्तान असमर्थ ठरल्याने भ्रष्टाचार आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचा ग्रे यादीतील समावेश कायम ठेवण्यात आला आहे, असे प्लेअर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Aquan Latest Update : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्राला धोका आहे का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Pune News: पुण्यात रोज अतिक्रमणांवर हातोडा! ;पुढील दोन महिने कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ', 'वारणा' दूध विक्री दरात सहा रुपये वाढ; उद्यापासून अंमलबजावणी, म्हशीसाठी तीन, गायीसाठी दोन रुपये उत्पादकांना जादा मिळणार

Latest Marathi News Live Update : अक्वान चक्रीवादळाचा धोका वाढला; ओडिशा, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा, वाऱ्याचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता

वैभव सूर्यवंशीपासून हरमनप्रीत कौरपर्यंत... TIME Magazine च्या प्रतिष्ठित यादीत भारताच्या नऊ खेळाडूंना स्थान

SCROLL FOR NEXT