गोळीबार गोळीबार
ग्लोबल

‘विराट’ विजयाचा जल्लोष अन् गोळीबार; कराचीत १२ जखमी

सकाळ डिजिटल टीम

कराची : हवेत गोळीबार अन् दोन जण ठार ही म्हण चांगलीच प्रसिद्ध आहे. अनेकदा याचे उदाहरण दिले जाते. अशीच काहीशी घटना भारत-पाकिस्तानच्या सामन्यानंतर पाकिस्तानात घडली. रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने भारताचा एकतर्फी पराभव केला. विश्वचषकात पहिल्यांदा भरताचा पराभव केल्याने पाकिस्तानात जल्लेष करण्यात आले. यावेळी केलेल्या गोळीबारात १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तान टी-२० विश्वचषकात भारताला आजवर पराभूत करू शकलेला नव्हता. त्यामुळे रविवारी खेळला गेलेला सामना भारतच जिंकेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, झाले उलटे. भारताने पाकिस्तानला विजयासाठी १५१ धावांचे लक्ष दिले. हे लक्ष पाकिस्तानने एकतर्फी गाठले. म्हणजे त्यांचा एकही खेळाडू बाद झाला नाही. ही भारतासाठी सर्वात लाजीरवानी गोष्ट आहे.

भारताचा दारूण पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या कराचीत जल्लोष करण्यात आला. रस्त्यावर उतरलेल्या काही पाकिस्तानी चाहत्यांनी हवेत गोळीबार केला. विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. कराचीतील ओरंगी टाउन सेक्टर-४ आणि ४ के चौरांगी भागात अज्ञात ठिकाणांहून झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. गुलशन-ए-इक्बालमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पोलिस उपनिरिक्षकाला गोळी लागल्याची महिती कराचीत पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली.

भारतासाठी हा मोठा पराभव असला तरी पाकिस्तान आणि चाहत्यांसाठी विश्वचषकातील हा पहीला विजय आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगणाला पोहोचला आहे. विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या गोळीबारीत १२ जण जखमी झाले. सुदैवाने कुणाचाही जीव गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

FIFA World Cup Trophy:"१८ कॅरेट सोनं आणि ६ किलो वजन! फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची किंमत किती? आकडा वाचलात का?"

Latest Marathi News Update : जळगावात कारागृहातील कैद्याकडून पोलिस रक्षकावर हल्ला

SCROLL FOR NEXT