Pakistan Crime 
ग्लोबल

Hindu Woman Murderd in Pak: पाकिस्तानात हिंदू महिलेची हत्या! हातपाय तोडून शीर अन् स्तन...; काळजाचा उडेल थरकाप

या हत्याप्रकरणात अमानुषतेचा कळस गाठण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : Hindu Woman Murderd in Pak: पाकिस्तानात एक भीषण हत्याकांड समोर आलं आहे. यामध्ये एका हिंदू महिलेची अमानुष पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. इथल्या शिंजोरो शहरात बुधवारी ही घटना घडली. यामध्ये महिलेचे हातपाय तोडून शीर धडावेगळं करण्यात आलं तर तिचे स्तनही कापण्यात आल्यानं थरकाप उडवणारं कृत्य घडलं आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेत्या कृष्ण कुमारी यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. (Pakistan crime news 40 year-old Hindu woman beheaded in Sinjhoro)

हत्या करण्यात आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव दया भेल असून ती साधारण ४० वर्षांची आहे. या महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. विधवा असलेल्या या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. तिचं शीर धडापासून वेगळ करण्यात आलं तर हे रानटी कृत्य करणाऱ्या लोकांनी तिच्या डोक्यावरचं संपूर्ण त्वचाही काढली आहे. तिचा मृतदेह आणि कापलेलं डोके गव्हाच्या शेतात टाकण्यापूर्वी आरोपीनं तिच्या डोक्याची कातडी काढण्यापर्यंत मजल गेल्यानं हा अमानुषतेचा कळस झाला आहे. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती देणाऱ्या कृष्ण कुमारी या पाकिस्तानातील पहिल्या महिला सिनेटर असून त्या हिंदू आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी या राजकीय पक्षाच्या त्या सदस्य आहेत. या घटनेवर बोलताना कार्यकर्ते फकीर शिवा कच्ची म्हणाले, "आम्ही या गरीब विधवा महिलेच्या अमानुष हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. यातील मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे"

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

यापूर्वी मार्च महिन्यात सिंध प्रांतातील १८ वर्षीय हिंदू तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. या तरुणीचं नाव पूजा होतं तिला ज्या व्यक्तीनं मारलं होतं त्या वाहिद बक्स लशरी यानं तिला लग्नापूर्वी धर्मांतर करण्यासाठी तकादा लावला होता, असं पाकिस्तानातील बातम्यांमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT