pakistan Sakal
ग्लोबल

Pakistan : "वाघ, सिंह, मांजर विकणे आहे"; गरिबीमुळे पाकिस्तानने प्राणी काढले विकायला

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आता आर्थिक संकटांची चाहूल लागली असून पैसे नसल्याच्या कारणावरून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचा विकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. लाहोर येथील प्राणिसंग्रहालयातील वाघ, सिंह, मांजर असे प्राणी पाकिस्तानने विक्रीला काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची बिकट परिस्थिती जगासमोर यायला हळूहळू सुरूवात झाली आहे.

(Pakistan Decide to Sell Animals From Zoo)

पाकिस्तानातील प्रचंड महागाई आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीचा परिणाम फक्त नागरिकांवरच नाहीतल प्राण्यांवरही होत असल्याचं समोर आलं आहे. लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांना खायला घालायला पैसे नसल्यामुळे तेथील सिंह विक्रीला काढले आहेत. त्याबरोबरच मोठे मांजर, सिंह आणि वाघांचाही लिलाव होणार आहे. खासगी संस्थांना हे प्राणि विकले जाणार असून त्यामुळे पैसा आणि जागा वाचेल असं मत प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

लाहोर येथील प्राणिसंग्रहालयात २ ते ५ वर्ष वयाचे २९ सिंह आहेत. त्यातील १२ सिंहाचा येत्या ११ ऑगस्टला लिलाव होणार असल्याचं लाहोर येथील प्राणि संग्रहालयाचे उपाध्यक्ष अहमद जनजुआ यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ६ चित्ता आणि २ बिबट्या प्राणिसंग्रहालयात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT