Pakistan esakal
ग्लोबल

आता पाकही आर्थिक संकटात; चीन, दुबईसह 'या' देशांनी नाकारली मदत

देशाच्या आर्थिक संकटामागे इम्रान खान सरकारचा हात

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांनी मान्य केल की पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे,रशीद यांनी सांगितल की चीन,दुबई,कतार आणि सौदी अरब ने पण पाकिस्तानची मदत केली नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून तातडीची आर्थिक मदत न मिळाल्याने शाहबाज शरीफ यांनी सरकारवरही टीका केली. शरीफ म्हणाले देशाच्या आर्थिक संकटामागे इम्रान खान सरकारचा हात असल्याचा आरोप केला.

शेख रशीद यांनी ट्विट केले की, आर्थिकदृष्ट्या देश संकटात अडकला आहे. चीन, दुबई, कतार आणि सौदी अरेबिया देखील पाकिस्तानच्या मदतीला आले नाहीत, आणि आयएमएफचे बेलआउट पॅकेजही आले नाही. माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानकडे कर्ज फेडण्यासाठीही पैसे नाहीत.

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परदेशी कर्ज फेडण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळेच पाकिस्तानला दिवाळखोरीचा धोका निर्माण झाला आहे. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानच्या मते, देशाचा अधिकृत परकीय चलन साठा $8.57 अब्ज वरून $754 दशलक्षवर आला आहे. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

IMF ने पाकिस्तानसमोर ठेवल्या कडक अटी

आर्थिक पॅकेज पूर्ववत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसमोर अनेक कठोर अटी घातल्या आहेत. आयएमएफने म्हटले आहे की आर्थिक पॅकेज मिळविण्यासाठी पाकिस्तानला वीज दर आणि पेट्रोलियम उत्पादनांवर कर वाढवावा लागेल. पाकिस्तानला भ्रष्टाचारविरोधी टास्क फोर्स देखील स्थापन करावे लागेल, जे सरकारी विभागांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तयार केलेल्या विद्यमान कायद्यांचे पुनरावलोकन करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT