Pakistan News 
ग्लोबल

Pakistan News: इम्रान खान यांना मोठा धक्का; 2024 मधील निवडणुकीसाठीचा अर्ज फेटाळला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा २०२४ साली निवडणूक लढण्यासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळला आहे.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा २०२४ साली निवडणूक लढण्यासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळला आहे. (Pakistan election body rejected former Prime Minister Imran Khan nomination to contest the 2024 national elections)

71 वर्षीय माजी क्रिकेटर इम्रान खान सध्या राजकीय आणि कायदेशीर लढाईमध्ये अडकले आहेत. त्यांना २०२२ मध्ये पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. २०१८ ते २०२२ या कार्यकाळात राज्याचे गिफ्ट विकल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत.

इम्रान खान हे पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना निवडणूक लढता येणार नाही. असे असले तरी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलं की, ते मतदारसंघाचे रसिस्टर्ड मतदार नाहीत आणि त्यांना कोर्टाने अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज आम्ही फेटाळत आहोत.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा मतदारसंघ मिनावली येथूनही निवडणूक लढण्याचा अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, इम्रान खान यांची लोकप्रियता पाकिस्तानमध्ये अद्यापही कामय आहे. इम्रान यांनी आरोप केलाय की, लष्कर मला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कराने हा आटोप फेटाळला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT