Pakistan Election Results nawaz sharif imran khan  
ग्लोबल

Pakistan Election Results: 75 वर्ष... 29 पंतप्रधान..एकाचाही कार्यकाळ पूर्ण नाही; पाकिस्तानच्या लोकशाहीची शोकांतिका!

Pakistan Election Results nawaz sharif imran khan Party: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा नवाझ शरीफ आणि इम्रान खान या दोघांच्या पक्षांनी केला आहे.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा नवाझ शरीफ आणि इम्रान खान या दोघांच्या पक्षांनी केला आहे. या कारणाने पाकिस्तानमध्ये अपक्ष विजयी उमेदवारांना महत्व आलं आहे. त्यामुळे येत्या काळात कोण सत्ता स्थापन करते हे स्पष्ट होईलच. अद्याप मतमोजणी सुरु आहे. पण, पाकिस्तानचा इतिहास हा अस्थिर सरकारांचा राहिला आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.

भारताप्रमाणे पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. पाकिस्तानला आतापर्यंत २९ पंतप्रधान लाभले आहेत. आतापर्यंत एकाला पंतप्रधानाला पूर्ण पाच वर्षांचे सरकार टिकवता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानची लोकशाही कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे स्पष्ट होतं. पाकिस्तानमध्ये संसदीय लोकशाही असली तरी, देशाच्या राजकारणात नेहमीच लष्कराचा प्रभाव राहिला आहे. पंतप्रधान कोण होईल हे लष्करच ठरवत आलं आहे. (Pakistan Election Results nawaz sharif imran khan Since 1947 Pakistan has had a total of 29 prime ministers)

पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यापासून पंतप्रधानाला वेगवेगळ्या कारणासाठी पद सोडावं लागलं आहे. कधी पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. कधी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, तर कधी पंतप्रधानाच्या हत्या देखील झाल्या आहेत. १९९३ मध्ये पाकिस्तानमध्ये पाचवेळा पंतप्रधान बदलण्याचा खेळ झाला. त्यावेळी नवाझ शरीफ यांच्याजागी बेलाख शेऱ मझारी पंतप्रधान झाले. परत शरीफ पंतप्रधानपदी आले. त्यानंतर पंतप्रधानपद मोईनुद्दीन अहमद कुरेशीकडे यांच्याकडे गेले. शेवटी ते बेनेधीर भुट्टो यांच्याकडे आलं.

पाकिस्तानमध्ये फक्त तीन असे पंतप्रधान झाले ज्यांना किमान चार वर्षांचा तरी कार्यकाळ लाभला. यात लियाकत अली खान, युसूफ रझा गिलानी आणि नवाझ शरीफ यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी २०२४ रोजी कडक सुरक्षेमध्ये निवडणुका पार पाडल्या. यावेळी इम्रान खान यांचा पीटीआय, नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हे पक्ष रिंगणात होते. इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत, तर नवाझ शरीफ हे चारवर्षे लंडनमध्ये राहून परत आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT