Pakistan election results PMLN in alliance talks with PPP Sakal
ग्लोबल

Pakistan election results: नवाझ शरीफ होणार चौथ्यांदा पंतप्रधान? सहयोगी पक्षांसोबत काय झाली डील?

Pakistan Elections results 2024: पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान आणि निकालादरम्यान अशांततेची स्थिती होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, मतमोजणी दरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला. ( Pakistan election results PMLN in alliance talks with PPP)

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये अद्याप गोंधळाची स्थिती आहे. मात्र, पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझते (PML-N) प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. शरीफ यांच्या पक्षाने पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) आणि मुत्ताहिदा कामी मुव्हमेंट-पाकिस्तान यांच्यासोबत सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु केल्या आहेत. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Pakistan election results PMLN in alliance talks with PPP MQMP Nawaz Sharif could be PM pti imran khan)

नवाझ शरीफ हे पंतप्रधान पद आपल्याकडे ठेवतील तर राष्ट्रपती आणि संसद अध्यक्ष हे पद सहयोगी पक्षांसाठी सोडले जातील यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान आणि निकालादरम्यान अशांततेची स्थिती होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, मतमोजणी दरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला.

तज्त्रांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानचे लष्कर सध्या तीन वेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समर्थनामध्ये आहे. माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान-ए-इंसाफ (PTI) याला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान जनतेला बदल हवाय असं यातून सूचित होत असल्याचा PTI पक्षाचा दावा आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या काय स्थिती आहे?

- अंतिम निकालामध्ये इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांना ९७ जागा जिंकता आल्या आहेत. तर, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७६ जागांवर विजय मिळवलाय. तसेच, पाकिस्तान पीपल्स पार्टीने ५४ जागा जिंकल्या आहेत. १७ जागा मुत्ताहिदा कामी मुव्हमेंट-पाकिस्तानला मिळाल्या आहेत.

- इम्रान खान यांच्या पक्षाच्या दाव्यानुसार, जवळपास १८ जागांमध्ये फेरफार झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. खान यांनी यूके आणि यूएसएमधील समर्थकांना आवाहन केलंय की त्यांनी निवडणुकीतील फसवणुकीबाबत आवाज उठवावा.

-पीटीआयच्या समर्थकांनी देशात आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे लष्कराना बळाचा वापर करावा लागत आहे. लोकांच्या एका ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी आणण्यात आली आहे. काही ठिकाणी संघर्ष झाल्याच्या बातम्या मिळत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT