Imran khan Sakal
ग्लोबल

Pakistan : 'पाकिस्तानचे निघाले दिवाळे, सरकार खोटं बोलतयं'

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीतून जात हे लपवून राहिलेले नाही. देशातील वाढत्या महागाई दरामुळे दैनंदिन वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कर विभागाचे माजी प्रमुख शब्बर झैदी म्हणाले, देशाचे दिवाळे निघाले आहे. सरकार देशातील समृद्धीविषयी खोटं बोलत आहे. हमदर्द विद्यापीठात देशाच्या आर्थिक स्थितीवर झैदी बोलत होते. वास्तविक पाकिस्तानच्या (Pakistan) टॅक्स एजन्सी फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी प्रमुख शब्बर झैदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. देश खूपच चिंताजनक स्थितीत आहे. सरकार म्हणते की देश समृद्धीच्या दिशेने चालला आहे, ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहे. व्हायरल व्हिडिओत झैदी म्हणतात, की आपण म्हणतोय की सर्वकाही चांगले आहे. देश योग्य मार्गाने चालला आहे. आपण मोठे यश संपादित केले आहे. आम्ही परिवर्तन आणले आहे. मात्र हे सर्व खोटे आहे. माझ्या निरीक्षणानुसार देश दिवाळीखोरीत निघाला आहे. (Pakistan Experience Bankrupt, Said Former Tax Chief Shabbar Zaidi)

हे सरकारसाठी चिंतेची बाब आहे. झैदी पुढे म्हणातात, प्रथम हे निश्चित करा की आम्ही दिवाळखोरीत निघालो आहोत. खोट बोलल्यामुळे लोकांचा विश्वासघात केला जात आहे. व्हायरल व्हिडिओवर झैदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्विट करुन आपले पूर्ण दीड तासांचे भाषण ऐकण्याची विनंती केली आहे. झैदी यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती कळण्यास मदत होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीतून जात हे लपवून राहिलेले नाही. देशातील वाढत्या महागाई दरामुळे दैनंदिन वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावा; सत्यशोधक वारकरी महासंघाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT