Sana Ramchand Gulwani esakal
ग्लोबल

27 वर्षाच्या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास

बाळकृष्ण मधाळे

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका हिंदू मुलीनं येथील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केलीय. 27 वर्षीय डॉ. सना रामचंद गुलवानी (Dr. Sana Ramchand Gulwani) हिने मे महिन्यातच सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षेत यश मिळवलं होतं. परंतु सोमवारी (ता. 20) तिची नियुक्ती निश्चित केली गेलीय. ही परीक्षा पाकिस्तानात सर्वात कठीण मानली जाते. यातूनच शासकीय सेवा, प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त्या होतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारताच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा घेतली जाते.

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका हिंदू मुलीनं येथील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केलीय.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डॉ. सनाने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, 'वाहे गुरुजी का खालसा.. वाहे गुरुजी की फतेह.' अल्लाहच्या कृपेनं मी CSS 2020 ची परीक्षा उत्तीर्ण केलीय., असं तिनं परमेश्वराचं आभार मानलेय. सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. यामध्ये यावर्षी केवळ 2% उमेदवारच यशस्वी झाले आहेत. मात्र, 27 वर्षीय डॉ. सना गुलवानी हिने पहिल्याच प्रयत्नात हे मोठं यश संपादन केलंय.

डॉ. सना ही मूळची शिकारपूरची आहे. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'मधील एका वृत्तानुसार, सना सिंध प्रांताच्या ग्रामीण सीटवरून या परीक्षेस बसली होती. ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवाअंतर्गत येते. माध्यमांशी संवाद साधताना सना म्हणाली, मी खूपच आनंदी आहे. हा माझा पहिला प्रयत्न होता आणि मला जे हवं होतं, ते मी साध्य केलंय, असं तिनं दिलखुलास सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी सनाने शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमधील पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर ती आता सर्जनही आहे. पाकिस्तानमध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळी घेतले जातात. तिच्याकडे यूरोलॉजीचीही पदवी आहे. यानंतर तिने आता फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची तयारीही सुरू केलीय. सना सांगते, माझ्या पालकांची मी प्रशासनात जावं अशी कोणतीच इच्छा नव्हती. वैद्यकीय व्यवसायामध्येच मी माझं करिअर करावं, असं त्यांचं स्वप्न होतं. आता विशेष म्हणजे, तिने दोन्ही लक्ष्य एकाचवेळी पूर्ण केले आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिक असण्याबरोबरच आता ती प्रशासनाचाही एक भाग बनणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT