crime 
ग्लोबल

धक्कादायक! पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबातील 5 सदस्यांची गळा चिरुन हत्या

सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका हिंदू कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये दहशत पसरली आहे. द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब रहीम यार खान शहरापासून 15 किलोमीटर दूर अबू धाबी कॉलोनीमध्ये रहात होते. ही जागा मुल्तान शहराच्या जवळ आहे. सर्व लोकांची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन चाकू, कुऱ्हाड आणि शस्त्र जप्त केले आहेत. 

रहीम यार खानचे सामाजिक कार्यकर्ता बीरबल दास यांनी मीडियाला सांगितलं की, मृत कुटुंबीयाचे प्रमुख राम चंद मेघवाल यांचं वय 35 ते 36 वर्ष होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून टेलरिंगचे दुकान चालवायचे. त्यांचे जीवन आनंदी होते. ही घटना अनेकांना धक्का देणारी आहे. पोलिस दोषींचा शोध घेत आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

काही महिन्यापूर्वी डॉक्टरची झाली होती

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. 6 महिन्यापूर्वी कराचीमध्ये एका हिंदू डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. डॉक्टरचे नाव लाल चंद बागरी होते. तो सिंध प्रांताच्या तांदो अल्यहारमध्ये प्रॅक्टिस करायचा. काही अज्ञात लोकांनी घरात घुसून चाकूने गळा कापून त्याची हत्या केली होती.  एका वर्षात पाकिस्तानमध्ये हिंदू डॉक्टरची ही दुसरी हत्या होती. याआधी कराचीमध्ये लरकानाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये डॉक्टर नम्रता चंदानीचा मृतदेह आढळला होता. पोस्टमार्टममध्ये स्पष्ट झालं होतं की, पीडितेची बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT