pm imran khan
pm imran khan pm imran khan
ग्लोबल

PM असताना भेट मिळालेल्या वस्तू Imran Khan यांनी दुबईत विकल्या? मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे नुकतेच पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तू जपून ठेवल्या असल्याची माहिती आहे. त्यांच्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तू सुमारे १४ कोटी रुपये किंमतीच्या असून त्यांची ठराविक किंमत देऊन त्या भेटवस्तू आपल्याकडे ठेवल्या होत्या.

इम्रान खान यांनी तिजोरीवरील भार कमी करण्याच्या आणि भ्रष्टाचार दूर करण्याच्या अवाहनावर त्यांनी पंतप्रधान पद मिळवले होते. त्यानंतर आता ते त्यांना मिळालेल्या भेटवस्तू दुबईमध्ये विकताना आढळले आहेत. असं वृत्त द न्यूज इंटरनॅशनल ने दिले आहे.

त्यांना मिळालेल्या भेटवस्तूमध्ये एक रोलेक्स घड्याळ, कफलिंक्सची एक जोडी, एक अंगठी आणि एक बॉक्स ज्यात एक नेकलेस, ब्रेसलेट आणि कानातले आहेत. या वस्तूंची किंमत ही २३.५ दशलक्ष इतकी असून त्याच्या बदल्यात त्यांनी ११.५ दशलक्ष रुपये देऊन त्यांच्याकडे कायम ठेवल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या रोलेक्स घड्याळाची किंमत ही ३.८ दशलक्ष इतकी असून २०१८ मध्ये त्यांनी ७ लाख ५४ हजार रुपये देऊन आपल्याकडे ठेऊन घेतले होते. दुसरी १५ लाख किंमत असलेल्या घड्याळासाठी २ लाख ९४ हजार रुपये देऊन त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. त्याचबरोबर दुसऱ्या भेटवस्तूच्या सेटमध्ये एक रोलेक्स घड्याळ, iPhone आणि इतर वस्तू ज्यांची किंमत ही १७ लाख ३० हजार आहे. त्या वस्तूंच्या बदल्यात त्यांनी ३ लाख ३८ हजार रुपये देऊन आपल्याकडे ठेऊन घेतल्या आहेत. असं द न्यूज इंटरनॅशनल ने दिलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे.

इम्रान खान यांनी १४० दशलक्ष किंमतीच्या भेटवस्तूंसाठी फक्त ३८ दशलक्ष रुपये दिले आहेत आणि त्यातील ८ लाख रुपयांच्या भेटवस्तूंसाठी कोणतीही रक्कम दिली नाही. त्यातील महागड्या वस्तू ते दुबईमध्ये विकताना आढळले आहेत असं पाकिस्ताने नवे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी सांगितलं. दरम्यान या भेटवस्तू त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर त्यांना मिळालेल्या आहेत. त्यामध्ये ८५ दशलक्ष रुपयांचे घड्याळ, १५ लाखांचा पेन, ८ कोटी ७५ लाखांची अंगठी आणि ५ कोटी ६७ लाखांचं कफलिंक्स यांचा सामावेश आहे. सदर भेट मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत ही त्यांनी स्थापन केलेल्या समितीने ठरवल्या असून त्यासाठी मूळ किंमतीच्या २० टक्के रक्कम त्यांनी मोजली आहे. असं द न्यूज इंटरनॅशनल च्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर या वस्तू इम्रान खान यांनी दुबईमध्ये विकल्या आहेत. त्या कुणी खरेदी केल्या आणि त्यासाठी कर भरला आहे की नाही याची माहिती मिळवावी लागेल असा आरोप पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी केला आहे.

नियमांनुसार पंतप्रधानांना बाहेरच्या देशातील नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू या सरकारी तिजोरीत जमा कराव्या लागतात. नाहीतर त्या भेटवस्तूच्या मूळ किंमतीच्या २० टक्के रक्कम भरुन ठेवू शकतात. इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना भेटवस्तू ठेवण्यासाठी ५० टक्के रक्कम भराव्या लागणाऱ्या कायद्यात बदल करुन ती रक्कम २० टक्के इतकी केली आहे. दरम्यान इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि युसूफ रझा गिलानी यांच्याविरुद्ध खजिन्यातून आलिशान भेटवस्तू आणि वाहने मिळवल्याच्या आरोपाखाली संदर्भ दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT