Inflation sakal
ग्लोबल

Pakistan Inflation : महागाईने मोडले पाकच्या जनतेचे कंबरडे; गॅस सिलिंडरचा भाव तीन हजार रुपयांवर

आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.

वृत्तसंस्था

इस्लामाबाद - आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. चीनमधील प्रसिद्ध फूड चेन असलेल्या एका रेस्टॉरंटला पाकिस्तानमध्ये सँडविच विकण्याची वेळ आली आहे. याशिवाय नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी ३ हजार पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहे.

पाकिस्तानात महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात वाढत ३१.४ टक्क्यांवर पोचला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर २७.४ टक्के होता. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल तसेच वीज महागल्याने महागाईच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

या वर्षाच्या प्रारंभी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचला, मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जुलै महिन्यात तीन अब्ज डॉलरचे पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचविले.

या वेळी पाकिस्तानवर नाणेनिधीने कडक अटी घातल्या. यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविण्याची अट घालण्यात आली होती. परिणामी पाकिस्तान सरकारने इंधनाच्या दरात वाढ केली. एवढेच नाही तर कर्जाचा व्याजदर देखील २२ टक्क्यांवर पोचला आहे. स्वयंपाकाचा गॅस ३०७९.६४ रुपयांना मिळत आहे.

पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या मासिक अहवालात म्हटले की, आगामी महिन्यांत महागाईचा दर २९ ते ३१ टक्क्यांच्या आसपास राहील. पुढच्या वर्षी थोडासा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नाणेनिधीचे शिष्टमंडळ ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी पाकिस्तानला येणार आहे. त्यावेळी शिष्टमंडळ पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारसमवेत कर व वीजेसह विविध क्षेत्रात सुधारणांवर चर्चा करणार आहे.

यात कामगिरी समाधानकारक राहिली तरच नाणेनिधी ७० कोटी डॉलरचा पुढचा हप्ता देणार आहे. आतापर्यंत पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलर कर्ज मिळाले असून उर्वरित रक्कम हप्त्याने मिळणार आहे.

वर्षभरात वाढलेले दर (%)

  • गृहनिर्माण - २९.७

  • शिक्षण - ११.१२

  • आरोग्य सेवा - २५.२८

  • कपडे - २०.५५

  • मनोरंजन - ५८.७७

भारताच्या तुलनेत पाच पट अधिक महागाई

पाकिस्तानच्या महागाईची भारताशी तुलना केली तर सुमारे पाचपट अधिक महागाईचा सामना पाकिस्तानचे नागरिक करत आहेत. ऑगस्ट महिन्यात भारताचा ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) दर ६.८३ टक्क्यांवर आला असून जुलै महिन्यात तो ७.४४ टक्के होता.

ऑगस्ट महिन्यात खाद्यान्नाचा महागाई दर हा जुलैच्या तुलनेत कमी झाला आहे. तो ९.९४ टक्के असून पूर्वी तो ११.५१ टक्के होता. आरबीआयने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा महागाईचा दर अधिक असला तरी पाकिस्तानच्या तुलनेत कमीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT