Pakistan Prime Minister Imran Khan esakal
ग्लोबल

हिजाब वादात पाकिस्तानची उडी! धार्मिक स्वातंत्र्यावर व्यक्त केली चिंता

भारतात सुरु असलेल्या हिजाब वादात आता पाकिस्तानची उडी

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : भारतात सुरु असलेल्या हिजाब वादावर आता पाकिस्तानने ही चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान म्हणतो, हिजाबच्या आडमध्ये भारतात अल्पसंख्याकांना दाबले जात आहे असून त्यांचा आवाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे योग्य नाही. न्यायालयाचा निर्णयही मानवाधिकाराविरुद्ध आहे. पाकिस्तानने यापूर्वीही भारतातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केलेले आहे. मग ते शेतकरी आंदोलन असो कि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय. पाकिस्तानने (Pakistan) शिक्षण संस्थांमध्ये हिजाब (Hijab) घालण्यास बंदीचा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत मंगळवारी चिंता व्यक्त केली. (Pakistan Jump On Hijab Debate, Says High Court Decision Fail To Save Religious Freedom In India)

हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यात अपयशी ठरले असल्याचा दावा केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्गात हिजाब घालण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका उडुपी येथील मुस्लिम विद्यार्थिनींनी केली होती. हिजाब घालणे हा इस्लाम धर्मात आवश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचे म्हणत मंगळवारी सदरील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, स्पष्टपणे हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्यतेचे सिद्धांत अबाधित राखण्यात अपयशी ठरले असून त्यामुळे मानवाधिकारांवर अतिक्रमण करते.

हा निर्णय मुस्लिम विरोधी सुरु असलेल्या मोहिमेतील आणखीन एक टप्पा आहे. भारत (India) आपली धर्मनिरपेक्ष ओळख गमावत चालला आहे. हे तेथील अल्पसंख्याकांसाठी घातक आहे. पाकिस्तानने भारत सरकारकडे अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिमांना त्यांच्या धर्माचे आचारण करण्याचे स्वातंत्र्याची सुरक्षा निश्चित करण्याची विनंत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT