Bomb blast in Pakisthan Bomb blast in Pakisthan
ग्लोबल

पाकिस्तानात कारचा स्फोट; 3 परदेशींसह चौघांचा मृत्यू

या अपघातात काही लोकं जखमी झाल्याची माहिती आहे.

दत्ता लवांडे

कराची : पाकिस्तानातील कराची विद्यापीठाच्या आवारात कार स्फोटात 3 परदेशी लोकांसह चार लोक ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही लोकं जखमी झाल्याची माहिती आहे.

कराची विद्यापीठाच्या आवारात झालेल्या कारच्या स्फोटात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३ लोकं परदेशी असल्याची माहिती पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिली आहे. तर जखमी झालेल्यांपैकी एक परदेशी, एक रेंजर्स अधिकारी आणि एक खाजगी रक्षक जखमी झाले असून त्यांना गुलशन-ए-इकबाल या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे

मृत्यू झालेले परदेशी नागरिक हे चीनचे असल्याची माहिती आहे. तसेच सिंधचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक अहमद मेहर यांनी मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्याशी संपर्क करून मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे, असे वृत्त पाकिस्तानातील डॉन या वाहिनीने दिले आहे.

विद्यापीठाच्या चीन भाषा प्रशिक्षण केंद्राजवळ हा अपघात घडला आहे. त्या ठिकाणी हे लोकं शिकायला आले असल्याची प्राथमिक माहितीतून समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेत या स्फोटामागे कुठल्या दहशतवादी संघटनांचा हात आहे का याचा तपास पोलिस करत असल्याच त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT