pakistan india covishield vaccine 
ग्लोबल

पाकिस्तानला मिळणार भारतीय कोविशील्डसह 4 कोटी 50 लाख लशींचे डोस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान सीमेवर नेहमीच कुरापती करत असतो. सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं, दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणं यांसारखी कामे पाककडून सुरु असतात. दरम्यान, सध्या कोरोनाच्या संकटकाळात पाकिस्तानला भारताची मदत मिळणार आहे. भारतात तयार होणाऱ्या कोविशील्डसह जवळपास साडेचार कोटी डोस पाकिस्तानला मिळणार आहेत.

पाकिस्तान कोरोना व्हॅक्सिनसाठी चीनवर अवलंबून आहे. चीनी लशीचे दोन लाख 75 हजार डोस आतापर्यंत पाकिस्तानमध्ये देण्यात आले आहेत. आता पाकिस्तानात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. पाकिस्तान सरकार यंदा सात कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची तयारी करत आहे. यानुसार पाकिस्तानच्या एनएचएसच्या सचिवांनी सांगितलं की, भारतात तयार होणारी ऑक्सफर्डची लस त्यांना मिळणार आहे. 

भारताकडून देण्यात येणारी ही कोरोना प्रतिबंधक लस द ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन (GAVI) च्या माध्यमातून मिळणार आहे. ही संघटना गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी लोक लेखा समितीला सांगितले की, देशाला भारताने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस याच महिन्यात मिळेल. ख्वाजा यांनी म्हटलं की, आतापर्यंत पाकिस्तानात 2 कोटी 70 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

पाकिस्तानने आतापर्यंत चार लशींसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये सिनोफ्राम आणि कॅनसिने बायो या दोन चीनच्या लशींचा समावेश आहे. तसंच ब्रिटनमधील ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशी आहेत. 

भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेनंतर 25 फेब्रुवारीला घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि इतर क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेवर संघर्ष होऊ नये यासाठी कराराचे पालन काटेकोरपणे करण्यावर एकमत झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT