pakistan new pm shehbaz-sharif reply pakistan desires peaceful ties in response to pm modi  Sakal
ग्लोबल

'भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवेत'; शाहबाज शरीफ यांचे PM मोदींना उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानने शांतता राखली पाहिजे आणि त्यांच्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना सांगितले.

शरीफ यांनी सोमवारी निवडून आल्यानंतर लगेचच भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य केले आहे. दोन्ही देशातील शांततापूर्ण संबंध असवेत म्हटलं आहे. पाक पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्या भाषणात म्हटले की, काश्मीर समस्येचे निराकरण झाल्यानंतर दोन्ही देशांना गरिबी आणि रोजगार यासारख्या सामायिक समस्यांवर लक्ष केंद्रित करता येईल. त्यांनी मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे, पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांचे पंतप्रधानपदावर झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले होते.

त्याला उत्तर देताना शरीफ यांनी लिहीले आहे की, “आभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. जम्मू आणि काश्मीरसह प्रलंबित वादांवर शांततापूर्ण तोडगा काढणे अपरिहार्य आहे,” असे शरीफ यांनी मंगळवारी ट्विटमध्ये म्हटले. “दहशतवादाशी लढण्यासाठी पाकिस्तानचे बलिदान सर्वांना माहिती आहे. चला शांतता राखूया आणि आपल्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करूया,” असे देखील ते पुढे म्हणाले.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या 100 हून अधिक खासदारांनी बहिष्कार टाकलेल्या संसदीय मतदानादरम्यान शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या निवडीनंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर मांडण्याची आणि काश्मिरी जनतेला राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देण्याबाबत देशाची चालत आलेली भूमिका सर्वांसमोर मांडली. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणातील परराष्ट्र धोरण विभागात चीन आणि अमेरिकेसह इतर कोणत्याही देशापेक्षा भारताला जास्त वेळ दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT