law-court 
ग्लोबल

Pakistan : अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून धर्मांतर नंतर लग्न, कोर्टाचा निर्णय बघून सगळेच च्रकावले

Sandip Kapde

Pakistan News: पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांचे मुस्लिम मुलांशी लग्न लावण्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान सिंध प्रांतातून एक प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे एका १४ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून, जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लिम पुरुषाशी लग्न केले गेले. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुलीला तिच्या पालकांकडे पाठवण्यास नकार दिला.

मुलीला तिच्या आई-वडिलांसोबत जायचे होते, तरीही कोर्टाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आपले म्हणणे मांडताना मुलगी दबावाखाली असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे तिला आश्रय गृहात पाठवण्यात आले आहे. (Pakistan News)

शुक्रवारी (9 जून) लरकानाच्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, जिथे सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी हिंदू मुलीला तिच्या पालकांसोबत तिच्या विनंतीनंतरही पाठवण्यास नकार दिला.

या घटनेबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुलीचे अपहरण झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये पीडित मुलगी तिने इस्लाम स्वीकारल्याचे सांगताना दिसली. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडिओमध्ये पीडितेने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT