ग्लोबल

'या लढ्यात मी भारतीयांसोबत'; कोरोना संकटात इम्रान खान यांनी भारतासाठी केली प्रार्थना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचं संकट आ वासून उभं आहे. कोरोनाच्या विळख्यात देशातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठं संकट उभं केलं असून सध्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशात दिवसाला जवळपास तीन लाखांच्या वर रुग्ण सापडत आहेत. भारतातील या परिस्थितीबाबत संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पाकिस्तानमधून देखील चिंता आणि काळजी व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच मी भारतीय नागरिकांसोबत असल्याचं देखील त्यांनी ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, मी भारतीय नागरिकांसोबत आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेशी लढा देत आहे. आमच्या शेजारच्या देशात तसेच जगामध्ये या महासाथीदरम्यान विषाणूशी झुंज देणारे सगळेच लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो. मानवतेला आव्हान देणारे हे जागतिक संकट आपण सगळ्यांनी एकत्र येऊन परतवून लावायलाच हवे.

#PakistanWithIndia हॅश्टॅग ट्रेंड

यासंदर्भात पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताविषयी काळजी व्यक्त केली आहे. या संकटाच्या समयी पाकिस्तानने भारताला मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #IndianLivesMatter #IndiaNeedOxygen #PakistanWithIndia असे हॅश्टॅग ट्रेड करत आहेत. या दरम्यानच पाकिस्तानचे समाजवेक अब्दुल सत्तार इदी यांचा मुलगा फैजल इदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फैजल यांनी आपल्या पत्रात लिहलंय की, हम इदी फाउंडेशनमध्ये भारतातील कोरोनाचा हाहाकार पाहत आहोत. मोठ्या संख्येने लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं पाहून आम्ही चिंतीत आहोत. त्यांनी पुढे याबाबत संवेदना व्यक्त करत सोबतच 50 ऍब्युलन्स देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: 'मिडल ईस्ट सोडा'; अमेरिकेचा नागरिकांना तातडीने प्रदेश सोडण्याचा इशारा, मिडल ईस्टमध्ये पुन्हा संघर्षाचा धोका?

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

SCROLL FOR NEXT