Pakistan PM Imran Khan on Indian Missile esakal
ग्लोबल

भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर आम्ही उत्तर दिले असते पण... : पाक PM इम्रान खान

सकाळ डिजिटल टीम

भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चुकून पडले होते. त्याला संरक्षण मंत्रालयाने देखील दुजोरा दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानात भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) भारताला (Indian) प्रत्युत्तर देऊ शकला असता. पण, आम्ही संयम दाखवला, असे इम्रान खान म्हणाले.

गेल्या ९ मार्चला भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत आले होते. क्षेपणास्त्र लाहोरपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या मियां चन्नूजवळील शीतगृहावर आदळण्यापूर्वी अनेक विमान कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, क्षेपणास्त्र पडल्यामुळे पाकिस्तानमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मियाँ चन्नूमध्ये भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर आम्हीही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, पण आम्ही संयम दाखवला, असे इम्रान खान म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यानिमित्त झालेल्या एका सभेत त्यांनी ही माहिती दिली. आपल्याला आपले सैन्य आणि देश अधिक मजबूत करायचा आहे, असंही इम्रान खान यावेळी म्हणाले.

तांत्रिक बिघाडामुळे चुकून क्षेपणास्त्र पडल्याचं स्पष्टीकरण भारतानं दिलं होतं. तसेच आम्ही चौकशी करू, असंही भारताकडून सांगण्यात आलं. पण, त्याबाबत आम्ही समाधानी नाही, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तसेच भारताने याची चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. तसा प्रस्ताव नवी दिल्लीला पाठवण्यात आला आहे, असंही पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने स्पष्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT