imran khan
imran khan esakal
ग्लोबल

इम्रान खान सरकारच्या अडचणीत वाढ, 150 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (pakistan PM Imran Khan) सरकारच्या चिंतेत वाढ झालीय. कारण पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून (pakistan election commission) यांच्यासह जवळपास 150 फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी जवळपास 154 लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व निलंबित

गेल्या वर्षी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून जवळपास 154 लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व निलंबित केलं होतं. मात्र या सदस्यांनी संबंधित तपशील सादर केल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आलं होतं. मात्र यंदा मंत्री फवाद चौधरी आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद तसेच अली शाह यांच्यासह जवळपास 150 फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आलं आहे.

संसदीय कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत

ज्या प्रतिनिधींचं सदस्यत्व निलंबित करण्यात आलं आहे. ते संसदीय कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी संबंधित तपशील सादर करेपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित राहील, असं निवडणूक आयोगाकडून म्हटलं गेलंय.

पाकिस्तानच्या निवडणूक मंडळानं का पाऊल उचललंय?

पाकिस्तानच्या निवडणूक मंडळानं हे पाऊल यासाठी उचललंय, कारण निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रत्येक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता आणि दायित्व तपशील अनिवार्यपणे दाखल करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचं उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT