Pakistan PM viral video eSakal
ग्लोबल

Pakistan PM : शाहबाज नॉट सो शरीफ! पंतप्रधानांनी महिलेकडून हिसकावली छत्री, भर पावसात ठेवलं भिजत; व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमुळे त्यांच्यावर भरपूर टीका होत आहे.

Sudesh

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या पॅरिस दौऱ्यावर आहेत. मात्र, याठिकाणी घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे त्यांच्यावर भरपूर टीका होत आहे.

शहाबाज शरीफ हे सध्या ग्लोबल फायनान्सिंग पॅक्ट परिषदेसाठी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर आहेत. गुरुवारी पॅरिसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यावेळी त्यांनी एका महिलेकडून छत्री हिसकावल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान शरीफ हे परिषदेच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा बाहेर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आलेल्या महिला स्वयंसेवकाच्या हातात छत्री होती. शरीफ गाडीतून उतरल्यानंतर ही स्वयंसेवक छत्री घेऊन त्यांच्या बाजूनेच चालत होती. मात्र, शरीफ यांनी तिच्या हातातून छत्री काढून घेत, पुढे एकट्यानेच चालायला सुरू केले. यामुळे ही स्वयंसेवक देखील गोंधळून गेली. अखेर, ती पावसात भिजतच त्यांच्या मागे येऊ लागली.

शहाबाज यांच्या या कृत्याचा व्हिडिओ पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर ट्विटर यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. शहाबाज यांनी केलेलं हे कृत्य आजिबात योग्य नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर, यातूनच त्यांचं चरित्र दिसून येतं, असंही एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT