Shabaz Sharif  Sakal
ग्लोबल

...अन् पाकिस्तानचे पंतप्रधान येताच लोकांनी दिल्या 'चोर चोर' अशा घोषणा

शाहबाझ शरीफ यांच्या सौदी अरब दौऱ्यादरम्यान ही घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ सध्या सौदी अरब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहबाझ मदिना इथल्या मस्जिद-ए-नवाबीमध्ये प्रवेश करत होते. तेव्हा लोकांनी चोर-चोर असे नारे देण्यास सुरुवात केली. लवकरच नारेबाजी करणाऱ्यांना अटक करण्यात आली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या प्रतिनिधी मंडळासह तीन दिवसाच्या अधिकृत सौदी अरब दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि राष्ट्रीय संसदेचे सदस्य शाहजैन बुगती यांचाही समावेश आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लोकांनी अशा प्रकारे विरोध करण्याला अप्रत्यक्षपणे इमरान खान जबाबदार असल्याचं मरियम औरंगजेब यांनी म्हटलं आहे.

औरंगजेब म्हणाल्या की, मी त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही, कारण या पवित्र भूमीचा वापर मला राजकारणासाठी करायचा नाहीये. पण त्यांनी पाकिस्तानी समाजाला उध्वस्त केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT